FIFA World Cup 2022: मोरक्कोने केला मोठा उलटफेर; वर्ल्ड नंबर 2 बेल्जियमला चारली धुळ!

Belgium vs Morocco: अल थुमामा स्टेडियमवर मोरोक्को आणि बेजियम (Belgium vs Morocco) यांच्यात खेळल्या सामन्यात मोरोक्कोने बेल्जियमचा 2-0 असा पराभव केल्यानंतर फुटबॉलप्रेमींना (Football) मोठ्ठा धक्का बसला आहे.

Updated: Nov 28, 2022, 01:57 AM IST
FIFA World Cup 2022: मोरक्कोने केला मोठा उलटफेर; वर्ल्ड नंबर 2 बेल्जियमला चारली धुळ! title=
Belgium vs Morocco,FIFA World Cup 2022

Belgium vs Morocco FIFA WC 2022: कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा वर्ल्ड कपमध्ये (FIFA World Cup 2022) मोरोक्कोने (Belgium vs Morocco) सर्वांनाच मोठा धक्का दिलाय. मोरोक्कोने रविवारी ग्रुप एफच्या मोठ्या सामन्यात जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या बेल्जियमचा 2-0 ने धुव्वा उडवला. FIFA WC 2022 मध्ये बेल्जियमचा हा पहिला (Morocco beat Belgium) पराभव आहे. (belgium vs morocco fifa world cup 2022 second ranked belgium slip to 0-2 defeat against morocco marathi news)

अल थुमामा स्टेडियमवर मोरोक्को आणि बेजियम (Belgium vs Morocco) यांच्यात खेळल्या सामन्यात मोरोक्कोने बेल्जियमचा 2-0 असा पराभव केल्यानंतर फुटबॉलप्रेमींना (Football) मोठ्ठा धक्का बसला आहे. बेल्जियमने पहिल्या सामन्यात कॅनडाचा पराभव केला होता. सेमीफायनल गाठण्यासाठी बेल्जियमला​क्रोएशियाविरुद्ध (Belgium vs croatia) विजय नोंदवावा लागणार आहे. 

मोरोक्कोसाठी अब्देलहामीद साबिरीने (Abdelhamid Sabiri) पहिला गोल केला. साबिरीने 73 व्या मिनिटाला गोल केला. झकेरिया अबोखलालने (Zakaria Aboukhlal) स्टॉपेज टाईममध्ये संघासाठी दुसरा गोल नोंदवला आणि 2-0 ने आघाडी मिळवून दिली.

आणखी वाचा - FIFA World Cup 2022: चॅम्पियन ब्राझीलला सर्वात मोठा धक्का; स्टार खेळाडू 'नेमार' संघातून आऊट!

24 वर्षांचा वनवास संपला

दरम्यान, 24 वर्षांनंतर फिफा वर्ल्ड कप स्पर्धेतील (After 24 years, Morocco won match in the FIFA World Cup) मोरोक्कन संघाचा हा पहिला विजय आहे. फिफा वर्ल्ड कपमधील मोरोक्कोचा तिसरा विजय राहिलाय. त्यांना शेवटचा विजय 1998 मध्ये होता, त्यावेळी मोरक्कोने स्कॉटलंडचा 3-0 असा पराभव केला. त्याआधी 1986 मध्ये त्यांना पहिला विजय मिळाला होता. जागतिक क्रमवारीत 22 व्या क्रमांकावर मोरोक्कोचा फिफा वर्ल्ड कप मधील हा पहिला विजय आहे.