फिफा फुटबॉल : सचिन तेंडुलकरने अशा दिल्या इंग्लंड टीमला शुभेच्छा

फिफा फुटबॉल : इंग्लंड आणि क्रोएशिया यांच्यात आज रंगणार उपांत्य फेरीचा सामना.

Updated: Jul 11, 2018, 10:23 PM IST
फिफा फुटबॉल : सचिन तेंडुलकरने अशा दिल्या इंग्लंड टीमला शुभेच्छा

मुंबई : फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीचा सामना रात्री ११.३० वाजता सुरु होणार आहे. या सामन्यात  इंग्लंड आणि क्रोएशिया यांच्यात लढत रंगणार आहे. दरम्यान, क्रिकेटचा देव म्हणून ओळखणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने अनोख्या पद्धतीने इंग्लंड संघाला शुभेच्छा दिल्यात. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

फिफा वर्ल्डकपचा दुसरा उपांत्य फेरीचा इंग्लंड विरुद्ध क्रोएशिया यांच्यात रशियातील लुझ्निकी स्टेडियमवर होत आहे. या सामन्याकडे जगभरातील फुटबॉलप्रेमींच्या नजरा लागल्या आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही एक व्हिडिओ शेअर करुन इंग्लंडला 'चिअर अप' केले आहे.  Come on England असे म्हणत ट्विट केलेय.

डेव्हिड बेकहम आणि रूनीसारखे नामवंत खेळाडू संघात असताना आधीच्या वर्ल्डकपमध्ये इंग्लंडचा संघ चांगली कामगिरी करु शकला नव्हता. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये मात्र हॅरी केनच्या नेतृत्वाखालील इंग्लंड टीमने आपल्या कामगिरीने सगळ्यांनाच थक्क करुन टाकले आहे. इंग्लंड तब्बल २८ वर्षांनंतर उपांत्य फेरीत पोहोचला आहे. इंग्लंडचा संघ १९६६मध्ये अंतिम फेरीत पोहोचला होता. तेव्हा अंतिम सामना जिंकून इंग्लंडने जगज्जेतेपद मिळवले होते. त्यानंतर १९९०मध्ये इंग्लंडने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती.