मिस्टर ३६० एबी डिव्हिलिअर्सकडून भारतीय फॅन्सना दोन-दोन खुशखबर

या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगतातून संन्यास घेऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारा, दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू एबी डिव्हिलिअर्सच्या चाहत्यांची आता निराशा होणार नाहीय.

Updated: Jul 11, 2018, 08:48 PM IST
मिस्टर ३६० एबी डिव्हिलिअर्सकडून भारतीय फॅन्सना दोन-दोन खुशखबर

बेला-बेला (दक्षिण आफ्रिका): या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगतातून संन्यास घेऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारा, दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू एबी डिव्हिलिअर्सच्या चाहत्यांची आता निराशा होणार नाहीय. कारण एबी डिव्हिलिअर्सने मंगळवारी १० जुलै रोजी एक महत्वाची घोषणा केली आहे. या घोषणेत एबी डिव्हिलिअर्सने म्हटलं आहे की, तो पुढील काही वर्ष इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळणार आहे.

वेबसाईट ईएसपीएनक्रिकइन्फोने दिलेल्या रिपोर्टनुसार, डिव्हिलिअर्सला काही घरगुती क्रिकेट टीम टायटन्सच्या प्रतिनिधित्वाची देखील अपेक्षा आहे, आयओओल डॉट सीओ डॉट झेडएला दिलेल्या वक्तव्यावर डिव्हिलिअर्स म्हणतो, मी पुढील अनेक वर्ष आयपीएलमध्ये खेळत राहणार आहे, यासोबत मी टायटन्ससाठी देखील खेळू इच्छितो आणि युवा खेळाडूंची मदत करू इच्छीतो.

एबी डिव्हिलिअर्सने म्हटलं आहे, जगभरातून काही प्रस्ताव मला मिळाले आहेत, पण मी सामान्यपणे विचार करणे योग्य समजतो, मला आशा आहे, मी मायदेशीची टीम टायटन्ससाठी खेळणं सुरूच ठेवणार आहे,

डिव्हिलिअर्सच्या निवृत्तीच्या घोषणेवरून हे स्पष्ट झालं आहे की, डिव्हिलिअर्सच्या खात्यात आता विश्वचषकाचं पारितोषिक कधीच येणार नाही. पण यावरून तो निराश नाही, हे विशेष.

डिव्हिलिअर्स म्हणतो, अनेक वर्षापासून वर्ल्डकप माझ्यासाठी लक्ष्य राहिलं. पण व्यक्तिगत खेळाची वास्तविक गोष्टींसोबत तुलना नको. यात खराब करिअरचा अंत होणार नाही. मी जरी ही टुर्नामेंट जिंकू शकलो नाही, पण क्रिकेटच्या अनेक चांगल्या आठवणी माझ्यासोबत आहेत.

मिस्टर ३६० म्हणून क्रिकेट जगतात ओळख बनवणाऱ्या, एबी डिव्हिलिअर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्व प्रकारच्या क्रिकेटला राम राम ठोकला. तेव्हापासून त्याच्या भारतीय चाहत्यांना उत्कंठा लागून आहे की एबी डिव्हिलिअर्स आयपीएलमध्ये खेळणार आहे किंवा नाही, आता एबी डिव्हिलिअर्सने आयपीएल खेळणार असल्याची घोषणा करून चाहत्यांच्या चेहऱ्यावर आनंद वाटला आहे. एबी डिव्हिलिअर्स आयपीएलमध्ये विराट कोहली नेतृत्व करत असणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळणार आहे.

आयपीएल २०१८ मध्ये एबी डिव्हिलिअर्सची बॅट त्याचा मित्र विराट कोहली सोबत तळपली होती, आयपीएलच्या सिझन ११ मध्ये बंगळुरूकडून खेळताना, शानदार बॅटिंग केली, यात त्यांच्या लांबलचक षटकार आणि फिल्डिंगची चर्चा सर्वत्र राहिली होती. आयपीएल २०१८ मध्ये १२ सामन्यांच्या ११ डावात, एबीने ४८० रन्स केल्या होत्या. ३० षटकार लावून सर्वात जास्त षटकार लगावल्याने, तो चौथ्या स्थानी होता. सर्वात जास्त लांबीचा षटकार लावण्यात एबी डिव्हिलिअर्सचंच नाव सर्वात वरती होतं.

आयपीएलमध्ये सर्वात लांबीचा षटकार १११ मीटरचा होता. तो एबीने लगावला होता. यात तिसऱ्या आणि पाचव्या स्थानावरचा षटकार देखील एबीच्या नावे आहे. या आयपीएलमध्ये डिव्हिलिअर्सने हैदराबादच्या विरोधात एक शानदार कॅच पकडला होता, या कॅच पाहून टीम आणि टीमचा कॅप्टन विराट कोहलीने म्हटलं होतं, असा कॅच स्पायडरमॅनच पकडू शकतो.

३४ वर्षांच्या एबी डिव्हिलिअर्सने ११४ टेस्ट मॅच, २२८ वनडे, ७८ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले होते. शेवटच्या क्षणी तो ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका दरम्यान झालेल्या शेवटच्या टेस्ट मॅचमध्ये दिसला होता.एबीने ११४ कसोटी सामन्यात ८ हजार ७६५ रन्स केले, ज्यात २२ शतकं, ४६ अर्धशतकांचा समावेश आहे.