Mohammad Azharuddin चा कार अपघात; रुग्णालयात केलं दाखल

नवीन वर्षाचं सेलिब्रेशन करायला जाताना अपघात 

Updated: Dec 30, 2020, 07:22 PM IST
Mohammad Azharuddin चा कार अपघात; रुग्णालयात केलं दाखल  title=

मुंबई : भारतीय संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीन (Mohammad Azharuddin) यांचा कार अपघात झाला आहे. हा अपघात लालसोट कोटा मेगा हायवे वर सूरवाल ठाण्याजवळ झाला आहे. अजहरुद्दीन आपल्या कुटुंबासोबत रणथंभौर जात होते त्याचवेळी त्यांच्या गा़डीला अपघात झाला. त्यांची गाडी एका ढाब्यात घुसली. या अपघातात कुणालाही गंभीर दुखापत झाली आहे. 

अजहरुद्दीन आणि त्यांचे कुटुंबीय नवीन वर्षासाठी सेलिब्रेशन करायला रणथंभौर येथे जात होते. मिळालेल्या माहितीनुसार, अजहरुद्दीन (Mohammad Azharuddin) यांची कार कंट्रोलच्या बाहेर गेली. कार कंट्रोलच्या बाहेर जाऊन एका ढाब्यात घुसली. ढाब्यात काम करणारा तरूण घटनास्थळी उपस्थित होती त्यामुळे या अपघातात त्याला दुखापत झाली. 

तरूणाला उपचारासाठी केला रुग्णालयात दाखल केलं. तर अजहरुद्दीन यांच्यासोबत असलेल्या एखा व्यक्तीला देखील थोडी दुखापत झाली आहे. त्यांना देखील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हा अपघात झाल्यानंतर DSP नारायण तिवारी घटनास्थळी पोहोचले. मोहम्मद अजहरुद्दीन आणि त्यांचे कुंटुंबिय हॉटेलमध्ये पोहोचले. 

मोहम्मद अजहरुद्दीन (Mohammad Azharuddin) १९९० मध्ये भारतीय संघाचे कर्णधार बनले. आपल्या कर्णधार कार्यकाळात त्यांनी भारताला १४ टेस्ट आणि ९० वन डे सामने जिंकून दिले. मोहम्मद अजहरुद्दीन (Mohammad Azharuddin) ने १९८४ साली आपलं डेब्यू केलं. त्यांना इंग्लंड विरुद्ध आपला पहिला टेस्ट सामना खेळला. त्यांनी भारतासाठी ९९ टेस्ट सामने खेळले. आणि त्यांचा ४५.०३ टक्क्यांनी ६२१५ धावा केल्या. त्यांचा सर्वश्रेष्ठ स्कोर हा १९९ धावा असा आहे.