मुंबई : आयसीसीचे माजी अंपायर आणि पाकिस्तानचे प्रथम श्रेणी क्रिकेटपटू असद रऊफ यांचं निधन झालं आहे. ते 66 वर्षांचे होते. त्यांच्या मृत्यूची माहिती भाऊ ताहिर रौफ यांनी दिली. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, ते लाहोरमधील दुकान बंद करून ते घरी परतत होते, तेव्हाच त्यांच्या छातीत दुखू लागलं, त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.
बीसीसीआयने सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये अंपायरिंगवर बंदी घातल्यानंतर असद रऊफ लाहोरच्या लांडा बाजारात कपड्यांचं आणि शूजचं सेकंडहँड दुकान चालवत होते.
असद रऊफ यांची अंपायरिंग कारकीर्द 2000 ते 2013 अशी होती. दरम्यान, ते आयसीसीच्या एलिट अंपायरिंग पॅनेलचे सदस्यही होते.
रऊफ यांचा अंपायरिंगचा प्रवास 1998 मध्येच सुरू झाला. पण 2000 साली पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यात झालेल्या सामन्यातून तो प्रथमच आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ते मैदानावर उतरले. त्यानंतर 4 वर्षांनंतर म्हणजेच 2004 मध्ये आयसीसीने त्यांटा आंतरराष्ट्रीय पॅनेलमध्ये समावेश केला.
सर्व काही सुरळीत सुरू असताना 2013 मध्ये त्याच्यावर आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंगचा आरोप झाला होता आणि इथेच त्यांच्या कारकिर्दीने यू-टर्न घेतला. आयसीसी अंपायरमधून तो मुंबई पोलिसांना वॉन्टेड आरोपी बनला. फिक्सिंगचा आरोप झाल्यानंतर रऊफ यांनी आयपीएलच्या मध्यावर भारत सोडला. यानंतर त्याच वर्षी आयपीएलनंतर झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधूनही त्यांना वगळला आलं. 2016 मध्ये बीसीसीआयने त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप ठेवून 5 वर्षांची बंदी घातली होती.
आयुष्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये असद रऊफ लाहोरच्या लांडा बाजामध्ये चपला-कपड्यांचे दुकान चालवत होते. नुकताच या दुकानात काम करतानाचा एक फोटोही व्हायरल झाला होता.
असद रऊफ यांच्यावर 2012 साली मुंबईतील एका मॉडेलने बलात्काराचा आरोप केला होता. मॉडेलच्या म्हणण्याप्रमाणे, ती आणि असद रऊफ दोघेही एकमेकांच्या प्रेमात होते. लग्नाचं आश्वासन देऊन रौफ यांनी तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. मात्र नंतर माघार घेतली. दरम्यान रौफ यांनी हे आरोप ठामपणे फेटाळून लावले