Virat Kohli ला एका Insta पोस्टसाठी मिळतात इतके पैसे, ऐकून तुम्हाला ही धक्का बसेल

टीम इंडियाचा महान फलंदाज विराट कोहलीने अलीकडेच त्याच्या ट्विटर अकाउंटवर 50 दशलक्ष फॉलोअर्सचा आकडा पार केला आहे. विराट सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तो सर्वाधिक फॉलो होणारा क्रिकेटर देखील आहे.

Updated: Sep 14, 2022, 10:54 PM IST
Virat Kohli ला एका Insta पोस्टसाठी मिळतात इतके पैसे, ऐकून तुम्हाला ही धक्का बसेल title=

मुंबई : विराट कोहलीचे (Virat Kohli) इंस्टाग्रामवर 211 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. इंस्टाग्रामवर 200 मिलियन फॉलोअर्स असलेला विराट कोहली हा पहिला भारतीय आहे. हॉपरच्या 2022 इंस्टाग्राम रिच लिस्टनुसार, विराटला प्रायोजित पोस्टमधून सुमारे 8.69 कोटी रुपये मिळतात.

इंस्टाग्रामवरून कमाई करणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत विराट कोहली 14 व्या क्रमांकावर आहे. फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो एका इंस्टाग्राम पोस्टसाठी सुमारे 150 मिलियन चार्ज करतो.

एका रिपोर्टनुसार विराटने 2020 मध्ये फेसबुकवरील एका पोस्टमधून सुमारे 2.5 कोटी रुपये कमावले होते. त्यावेळी त्याचे फॉलोअर्स 34 दशलक्ष होते जे आता 49 दशलक्ष झाले आहेत, त्यामुळे त्याच्या कमाईचा आकडाही खूप मोठा आहे.

विराट कोहलीचे ट्विटर अकाऊंट आता भारतातील तिसरे सर्वात मोठे अकाऊंट आहे. त्यांच्यापेक्षा जास्त फॉलोअर्स फक्त पीएमओच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर अकाउंटवर आहेत.

विराट कोहलीच्या ट्विटर, इन्स्टाग्राम आणि फेसबुकच्या फॉलोअर्सची एकूण संख्या 310 दशलक्ष म्हणजेच 31 कोटींच्या पुढे गेली आहे.