close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

....म्हणून शोएब अख्तर करणार होता सोनाली बेंद्रेचं अपहरण

शोएब अख्तर हा फक्त मैदानावरच नव्हे तर, मैदानाबाहेरही प्रचंड लोकप्रिय होता. 

Updated: Jun 16, 2019, 01:43 PM IST
....म्हणून शोएब अख्तर करणार होता सोनाली बेंद्रेचं अपहरण

मुंबई : क्रिकेट आणि कलाविश्वाचं नातं हे फार जुनं आहे. त्याविषयी वेगळं काही बोलण्याची गरजच नाहीच. भारत- पाकिस्तान क्रिकेट संघांमध्ये असणारं नातंही असंच काहीसं आहे. सध्याच्या घडीला भारत आणि पाकिस्तानविषयीच्या क्रिकेट सामन्याव्यतिरिक्त अशाच काहीशा चर्चा रंगत आहेत. या चर्चा आहेत, अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि पाकिस्तान क्रिकेट संघातील माजी खेळाडू, वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यांच्याविषयीच्या. 

'रावळपिंडी एक्स्प्रेस' म्हणून प्रसिद्ध असणारा क्रिकेटपटू शोएब अख्तर हा फक्त मैदानावरच नव्हे तर, मैदानाबाहेरही प्रचंड लोकप्रिय होता. अनेक देशांतील तरुणीच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या या खेळाडूचं मन मात्र एका भारतीय अभिनेत्रीवर भाळलं होतं. 

शोएबच्या मनात घर केलेली ती अभिनेत्री होती, सोनाली बेंद्रे. 'इकॉनॉमिक टाईम्स'च्या वृत्तानुसार 'इंग्लिश बाबू देसी मेम' या चित्रपटात ज्यावेळी शोएबने सोनालीला पाहिलं त्याचवेळी तो तिच्या प्रेमात पडला होता. एका चॅट शो मध्ये तर, आपण सोनालीचा फोटो पाकिटात ठेवायचो, असंही त्याने स्पष्ट केलं होतं. किंबहुना तिचे अनेक पोस्टरही त्याच्या खोलीच्या भिंतींवर चिकटवलेले होते. 

सोनालीवर भाळलेल्या शोएबने तर, तिने आपल्या प्रेमाचा प्रस्ताव नाकारल्याच थेट तिचं अपहरण करण्याचं  ठरवलं होतं. सोनालीप्रती ते एका चाहत्याचं वेड होतं, असंच म्हणावं लागेल. 

दरम्यान, सोनालीला जेव्हा त्यावेळी शोएबविषयी विचारण्यात आलं होतं; तेव्हा मात्र तिने आपण पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तरला ओळखत नसल्याचं तिने सांगितलं होतं. आपण क्रिकेटप्रेमी नसल्याचंही तिने स्पष्ट केलं होतं. सोनाली आणि शोएबच्या या अफलातून गोष्टीची क्रीडा वर्तुळातही बरीच चर्चा झाली. अर्थात भारत- पाकिस्तान सामन्याच्या पार्श्वभूमीवर ही बाब पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे, ज्याचा सध्याच्या घडीला या दोन्ही सेलिब्रिटींशी थेट संपर्क नाही, हेसुद्धा तितकंच खरं.