मुंबई: जपानची क्वीन नाओमी ओसाका आणि फेडररनंतर फ्रेंच ओपनमधून राफेल नदाल बाहेर पडला आहे. तर एका टेनिसपटूनं इतिहास रचत पहिल्यांदाच नडालला पराभूत केलं आहे. या टेनिसपटूचं खूप कौतुक होत आहे. राफेल नदालच्या करियरच्या इतिहासात पहिल्यांदाज त्याला एवढ्या मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. सेमीफायनल सामन्यात नडाल पराभूत झाल्यानं त्याला फ्रेंच ओपनमधून बाहेर जावं लागलं आहे.
टेनिसपटू नोवाक जोकोविच याने राफेल नदालला पराभूत केलं आहे. पहिल्या सेटमध्ये पराभव स्वीकारावा लागल्यानंतर नडालने पुन्हा जबरदस्त कमबॅक केलं. मात्र दुसऱ्यावेळीही त्याच्या हातून विजय निसटला आणि नोवाकचा विजय झाला.
जोकोविच पुढचा सामना रविवारी ग्रीसच्या युवा खेळाडू स्टेफानोस सिटसिपास सोबत होणार आहे. जोकोविचची नजर आता दुसऱ्यांदा फ्रेंच ओपनची ट्रॉफी मिळवण्याकडे असणार आहे. याआधी जोकोविचने क्ले कोर्टवर 2016 मध्ये पहिल्यांदा हा पुरस्कार मिळवला होता.
20 ग्रॅण्डस्लॅम मिळवणाऱ्या नदालला त्याच्या करियरमध्ये तिसऱ्यांदा पराभवाचा सामना करावा लागला आहे. क्ले कोर्टवर त्याने 108 सामने खेळले ज्यामध्ये आतापर्यंत केवळ हा तिसरा सामना आहे ज्यामध्ये तो पराभूत झाला. जोकोविचने 3-6, 6-3, 7-6, 6-2 ने नडालला पराभूत केलं आहे.
ग्रीसचा युवा खेळाडू स्टेफानोस सिटसिपास शुक्रवारी फ्रेंच ओपनच्या सेमीफायनलमध्ये एलेक्सझेण्डर ज्वेरेव मात केली. 5 सेटपर्यंत झालेल्या या सामन्यात त्याने 6-3, 6-3, 4-6, 4-6, 6-3 ने मात दिली आहे. रविवारी स्टेफानोस आणि जोकोविच यांच्यात अंतिम सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष असणार आहे.