'पोलीसच आमचे गुप्तहेर... ते काही करू शकत नाहीत' गौतम गंभीरला आणखी एक धमकीचा मेल

28 नोव्हेंबरच्या रात्री गौतम गंभीर यांच्या ई मेल आयडीवर एक मेल आला. 

Updated: Nov 28, 2021, 12:41 PM IST
'पोलीसच आमचे गुप्तहेर... ते काही करू शकत नाहीत' गौतम गंभीरला आणखी एक धमकीचा मेल

नवी दिल्ली: गौतम गंभीर यांना पुन्हा एकदा धमकीचा मेल आला आहे. एका आठवड्यामध्ये गौतम गंभीर यांना तिसऱ्यांदा धमकीचा मेल आल्याची माहिती मिळाली आहे. यावेळी मेलमध्ये पोलिसांचा उल्लेखही करण्यात आला आहे. 

28 नोव्हेंबरच्या रात्री गौतम गंभीर यांच्या ई मेल आयडीवर एक मेल आला. isskashmir@yahoo.com या ई मेलवरून गौतम गंभीर यांना मेल करण्यात आला आहे. त्यात दिल्ली पोलीस आणि आयपीएस श्वेता हे आमचं काही बिघडवू शकत नाही, असंही लिहिलं आहे. 

पोलिसांमध्येही आमचे गुप्तहेर आहेत. ते तुमच्याबद्दल आम्हाला सर्व माहिती देत आहेत असंही या ई मेलमध्ये लिहिण्यात आलं आहे. हा ई मेल ISIS कश्मीरने पाठवल्याचं समजत आहे. या ई-मेलची माहिती घेऊन पोलिसांकडून तपास सुरू आहे. 

याआधी गौतम गंभीर यांना दोन वेळा धमकीचे मेल आले आहेत. त्यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. याआधीचे मेल पाकिस्तानच्या कराची इथून आल्याची माहिती मिळाली होती.