मोईन अलीचा विक्रम! 6-6-6-6-6-6-6-6-6

धोनीच्या संघातील ऑलराऊंडर खेळाडूची मैदानात धमाल...षटकारांची आतषबाजी 23 बॉलमध्ये काढल्या 77 धावा 

Updated: Nov 28, 2021, 12:01 PM IST
मोईन अलीचा विक्रम! 6-6-6-6-6-6-6-6-6

मुंबई: चेन्नई संघाच्या सुपरडुपक ऑलराऊंडरने कमालीची कामगिरी केली आहे. त्याच्या कामगिरीचं कौतुक सोशल मीडियावर होत आहे. इंग्लंडचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने T10 लीग 2021-22 मध्ये मोठा धमाका केला. अबुधाबी विरुद्धच्या सामन्यात 23 चेंडूमध्ये 334 च्या स्ट्राइक रेटने 77 धावांचा तुफानी पल्ला गाठला. एवढेच नाही तर त्याने 9 षटकार आणि 3 जबरदस्त चौकार मारले. 

अलीच्या झंझावाती खेळीच्या जोरावर नॉर्दर्न वॉरियर्स संघाने टीम अबुधाबीचा 10 गडी राखून पराभव केला. T10 लीगच्या 19 व्या सामन्यात नॉर्दर्न वॉरियर्सने टॉस जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. अबुधाबी संघाने पहिल्या 10 ओवरमध्ये 6 बाद 145 धावा केल्या.

नॉर्दर्न वॉरियर्स संघासमोर 146 धावांचं आव्हान ठेवलं. 10 ओवरमध्ये 146 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी उतरलेल्या नॉर्दन वॉरियर्स संघाचे सलामीवीर मोईन अली आणि केनर लुईस यांनी खेळपट्टीवर येताच धमाकेदार फलंदाजी केली. 

आबुधाबी संघाला दोघांनी मिळून धुतलं. 32 चेंडूत 65 धावा करून नाबाद राहिला. लुईसने आपल्या खेळीत 4 चौकार आणि 6 षटकार मारले. एकही गडी न गमवता नॉर्दर्न वॉरियर्सनी दणदणीत विजय मिळवला. 

मोईन अली चेन्नई संघाकडून IPL 2021 मध्ये खेळला आहे. त्याने महेंद्रसिंह धोनीच्या संघातही चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे CSK पुन्हा मोईन अलीला आपल्याकडे घेणार का याकडे आता सर्वांचं लक्ष आहे.