पद्मावती वादावरुन संतापला गौतम गंभीर, मांडले कटू सत्य

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित पद्मावती या सिनेमावरुन सध्या देशात चांगलाच वाद सुरु आहे. या वादावर प्रत्येकजण आपली प्रतिक्रिया व्यक्त करतंय. अनेकांनी याला विरोध केलाय तर काहीजण याला सपोर्टही करतायत.

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Nov 26, 2017, 03:39 PM IST
पद्मावती वादावरुन संतापला गौतम गंभीर, मांडले कटू सत्य title=

मुंबई : संजय लीला भन्साळी दिग्दर्शित पद्मावती या सिनेमावरुन सध्या देशात चांगलाच वाद सुरु आहे. या वादावर प्रत्येकजण आपली प्रतिक्रिया व्यक्त करतंय. अनेकांनी याला विरोध केलाय तर काहीजण याला सपोर्टही करतायत.

दीपिकालाही धमकी

इतकंच नव्हे तर पद्मावतीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दीपिका पदुकोणलाही जीवे मारण्याची धमकीही मिळालीये. दीपिकाचे नाक काप कापण्याऱ्यासाठी तर बक्षिस जाहीर करण्यास आलेय.

पद्मावतीवरुन सुरु असलेल्या वादादरम्यान भारताचा क्रिकेटर गौतम गंभीर चांगलाच भडकलाय. याबाबत गंभीरने ट्विट केलंय. या ट्विटद्वारे त्याने कटू सत्य जगासमोर आणलंय. 

पाहा काय म्हणालाय ट्विटरवर

गौतम गंभीर ट्विटरवर म्हणालाय, नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ऑफ ब्युरोच्या माहितीनुसार, १९९५ ते २०१५पर्यंत तब्बल ३,२१,४२८ शेतकऱ्यांनी आणि शेतीशी संबंधित मजूरांनी आत्महत्या केली. विकिपीडियानुसार काश्मीरमध्ये एक लाख सामान्य नागरिक आणि लष्कराच्या जवानांनी आपले प्राण गमावलेय. मात्र प्राईम टाईमच्या पेजवर मोठी बातमी ही पद्मावती सिनेमाच्या रिलीज डेटवरुन सुरु अशलेल्या वादाबाबत आहे. 

 

गंभीरच्या या ट्विटनंतर यूझर्सनी त्याची चांगलीच स्तुती केलीये. गंभीरने ट्विटमधून मांडलेला हा मुद्दा खरंच गंभीर आहे आणि आपण सर्वांनी यावर विचार करणे गरजेचे आहे.