गेलने रचला इतिहास, 1 हजार सिक्स मारणारा जगातील पहिला क्रिकेटर

ख्रिस गेलने रचला इतिहास...

Updated: Oct 30, 2020, 10:35 PM IST
गेलने रचला इतिहास, 1 हजार सिक्स मारणारा जगातील पहिला क्रिकेटर title=

अबुधाबी : इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या मोसमात क्रिकेटच्या टी-20 फॉरमॅटमध्ये 1000 सिक्स मारणारा ख्रिस गेल हा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे, ज्याने आपल्या स्फोटक फलंदाजीने जगभरातील टी-20 लीगमध्ये आपले विशेष स्थान निर्माण केले आहे.

गेलने किंग्ज इलेव्हन पंजाबकडून 99 धावांची जोरदार खेळी केली. त्याने 63 बॉलमध्ये 8 सिक्स तर 6 फोर मारले. त्याला जोफ्रा आर्चरने बोल्ड केले. त्याच्या खेळीमुळे पंजाबने महत्त्वपूर्ण सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध 185/4 धावा केल्या.

41 वर्षीय गेलने टी-20 क्रिकेटमध्ये एक हजार सिक्स मारण्याचा विक्रम केला आहे. आयपीएलमध्ये त्याने सर्वाधिक 349 सिक्स मारले आहेत. शुक्रवारी अबुधाबी येथे राजस्थान रॉयल्स विरुद्ध झालेल्या सामन्यात हा आकडा गाठण्यासाठी त्याला 7 सिक्सची गरज होती. या कॅरेबियन खेळाडून जगात सर्वाधिक सिक्स मारण्याचा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे.

टी-20 मध्ये सर्वाधिक सिक्स

1. ख्रिस गेल: 410 सामने, 1001 सिक्स

2. केरॉन पोलार्ड: 524 सामने, 690 सिक्स

3. ब्रेंडन मॅक्युलम: 370 सामने, 485 सिक्स

4. शेन वॉटसन: 343 सामने, 467 सिक्स

5. आंद्रे रसेल: 339 सामने, 447 सिक्स

आयपीएलच्या 13 व्या सत्राच्या सुरूवातीला किंग्ज इलेव्हन पंजाबच्या गेलला 1000 सिक्स पूर्ण करण्यासाठी 22 सिक्सची आवश्यकता होती. 7 सामन्यानंतर त्याला क्रीजवर जाण्याची संधी मिळाली, तरीही त्याने हा आकडा गाठला. टी-20 मध्ये सर्वाधिक फोर (1041) मारण्याचा विक्रमही गेलच्या नावावर आहे.