साक्षीच्या उपस्थितीत, स्टेडिअममध्ये एका मुलीकडून MS Dhoniला प्रपोज; म्हणाली...

भारतासह जगभरातील अनेक लोकांनी माही प्रती आपले प्रेम व्यक्त केलं आहे.

Updated: Oct 5, 2021, 09:06 PM IST
साक्षीच्या उपस्थितीत, स्टेडिअममध्ये एका मुलीकडून MS Dhoniला प्रपोज; म्हणाली... title=

मुंबई : चेन्नई सुपर किंग्जचा सध्याचा कर्णधार एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, परंतु तो आयपीलमध्ये खेळत आहे. धोनीचे फॉन्स अजूनही त्याला सपोर्ट करतात आणि त्याच्यावर आपलं प्रेम दर्शवतात. भारतासह जगभरातील अनेक लोकांनी माही प्रती आपले प्रेम व्यक्त केलं आहे. याचे कारण केवळ धोनीचे अफाट यशच नाही, तर त्याचा स्वभावही आहे. त्याचा स्वभाव लोकांना फार आवडतो.

'कॅप्टन कूल' महेंद्रसिंग धोनीची महिला फॅन फॉलोइंग देखील खूप जास्त आहे. याचे पुरावे आपण अनेकदा स्टोडीएममध्ये किंवा स्टे़डीअम बाहेर आपल्याला पाहायला मिळाले आहे. आयपीएल 2018 दरम्यान असेच काहीसे घडले, जेव्हा एका मुलीने माहीबद्दल खुलेपणाने आपल्या मनातील गोष्ट स्पष्ट केली.

आयपीएल 2018 दरम्यान जेव्हा चेन्नई सुपर किंग्जचा सामना चालू होता, तेव्हा एमएस धोनीची पत्नी साक्षी धोनी देखील स्टेडियममध्ये उपस्थित होती. परंतु तरीही माहीचा महिला फॅन स्वतःला आपलं प्रेम व्यक्त करण्यापासून स्वत:ला रोखू शकला नाही.

चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील या सामन्यादरम्यान, एका अनोळखी मुलीने मॅच दरम्यान एक पोस्टर दाखवला ज्यावर तिने लिहिले होते, 'माझा भावी साथीदार मला माफ कर , पण एमएस धोनी नेहमीच माझे पहिले प्रेम असेल. मी तुझ्यावर प्रेम करते माही."

एमएस धोनीच्या या महिला चाहत्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. आयसीसी सुद्धा याला सोशल मीडियावर शेअर करण्यापासून स्वतःला रोखू शकले नाही. ट्विटरवर चाहत्यांनी या फोटोला भरपूर प्रतिक्रिया दिल्या आहेत.