भारतीय तरुणीच्या प्रेमात पडला हा ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज क्रिकेटर

तर ठरले भारतीय मुलीशी लग्न करणारा दुसरा ऑस्ट्रेलियन खेळाडू

Updated: Sep 3, 2019, 03:45 PM IST
भारतीय तरुणीच्या प्रेमात पडला हा ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज क्रिकेटर

मुंबई : भारतीय तरुणीला हृदय देणाऱ्यांच्या यादीमध्ये आणखी एक क्रिकेटरचं नाव जुळलं आहे. ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक ऑलराउंडर ग्लेन मॅक्सवेल एका भारतीय मुलीच्या प्रेमात पडला आहे. ग्लेन मॅक्सवेल मागील 2 वर्षापासून मूळची भारतीय असलेल्या तरुणीला डेट करतो आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Missing this angel of mine @gmaxi_32 bring on summer & date nights #throwback

A post shared by VINI (@vini.raman) on

ग्लेन मॅक्सवेल आणि मूळची भारतीय असलेली विनी रमन मागील 2 वर्षापासून एकत्र आहेत. मॅक्सवेल विनी रमनसोबत विवाह देखील करणार आहे. पण तारीख अजून पुढे आलेली नाही. जर ग्लेन मॅक्सवेल मूळची भारतीय असलेल्या विनी रमनसोबत विवाह करत तर तो मूळच्या भारतीय तरुणीशी विवाह करणारा शॉन टेटनंतर दुसरा ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरेल.

2014 मध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर शॉन टेटने मूळच्या भारतीय मासूम सिंघासोबत विवाह केला होता. दोघेही आयपीएल पार्टीमध्ये एकमेकांना भेटले होते. त्यानंतर ते रिलेशनशिपमध्ये होते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

lpm (laughs per minute) always in the high 100's with you

A post shared by VINI (@vini.raman) on

ग्लेन मॅक्सवेल विनी रमनसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. विनी ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये स्थायिक आहे. इंस्टाग्राम प्रोफाईलनुसार ती फार्मासिस्ट आहे. विनी रमनने इंस्टाग्राम अकाऊंटवर मॅक्सवेल सोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Moments like these making the moments apart easier

A post shared by VINI (@vini.raman) on

ऑस्ट्रेलियाई क्रिकेट बोर्ड अवॉर्ड सेरेमनीमध्ये देखील दोघे एकत्र दिसले होते. ग्लेन मॅक्सवेल सध्या इंग्लंडमधील टी-20 ब्लास्टमधील लंकाशायरकडून खेळतो आहे. वर्ल्डकपमध्ये मॅक्सवेलने इतकी चांगली कामगिरी केली नव्हती.