तुझ्यासोबत फलंदाजी करणार नाही...; कोहलीने रनआऊट केल्यानंतर मॅक्सवेलचा मोठा निर्णय?

चेन्नईविरूद्धच्या सामन्यात बंगळूरूचे दोन फलंदाज विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्यात फलंदाजी दरम्यान गडबड झाल्याचं दिसून आलं. 

Updated: May 6, 2022, 01:03 PM IST
तुझ्यासोबत फलंदाजी करणार नाही...; कोहलीने रनआऊट केल्यानंतर मॅक्सवेलचा मोठा निर्णय? title=

मुंबई : बुधवारी रॉयल चॅलेंजर बंगळूरू विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्या सामना रंगला होता. आरसीबीने 13 रन्सने चेन्नईला मात दिली होती. दरम्यान या सामन्यात बंगळूरूचे दोन फलंदाज विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्यात फलंदाजी दरम्यान गडबड झाल्याचं दिसून आलं. 

बंगळूरूची फलंदाजी करत असताना मॅक्सवेल आणि कोहली यांच्यामध्ये गडबड झाल्याचं दिसून आलं. या गडबडीमुळे ग्लेन मॅक्सवेलला रन आऊट होऊन पव्हेलियनमध्ये परतावं लागलं. या डावात मॅक्सवेलला केवळ 3 बॉल खेळण्याची संधी मिळाली. दरम्यान या संपूर्ण प्रकरणानंतर मॅक्सवेलने कोहलीसोबत पुन्हा फलंदाजी करणार नसल्याचं सांगितलं.

आरसीबीच्या 9 व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर कोहलीने ऑफ साइडवर शॉट मारला आणि रन घेण्यासाठी धावला. दुसरीकडून एंडकडून मॅक्सवेल पण रनसाठी धावला. मात्र तो पोहोचण्यापूर्वी धोनीने त्याला रन आऊट केलं. 

दरम्यान आरसीबीने सामना जिंकल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये जल्लोष सुरु होता. यावेळी मॅक्सवेल मस्करीच्या स्वरात म्हणाला, मी तुझ्यासोबत फलंदाजी करू शकत नाही. तू खूफ वेगाने धावतोस. तु एक, दोन हीट करतोस, मी नाही.

या मजेदार संभाषणाची सुरुवात कोहलीने केली आणि ड्रेसिंग रूममध्ये प्रवेश करताच त्याने मॅक्सवेलला "सर्वात महान जखमी खेळाडू" म्हटलं होतं.