Suryakumar Yadav Sport News : नुकत्याच पार पडलेल्या टी-20 वर्ल्ड कपवर इंग्लंडने आपलं नाव कोरलं आहे. भारताला इंग्लंडने सेमी फायनलमध्ये पराभव करता घरचा रस्ता दाखवला होता. भारतीय गोलंदाजी आणि सलामीचे फलंदाज रोहित शर्मा आणि के. एल. राहुल यांचा खराब फॉर्ममध्ये होते याचा फटका भारतीय संघाला बसला. मात्र सुर्यकुमारने आपल्या बॅटिंगने सर्वांची मनं जिंकली आहेत. याच पार्श्वभूमीवर सुर्यकुमार यादवबाबत वर्ल्ड कपमध्ये शतक ठोकणाऱ्या न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्सने कौतुक केलं आहे. (Glenn Phillips made a big statement about Suryakumar Yadav Sport Marathi News)
सुर्याची बॅटींग स्टाईल अविश्वसनीय आहे, तो ज्या पद्धतीने फलंदाजी करतो तशी फलंदाजी करण्याचं मी स्वप्नातही विचार करू शकत नाही. मी त्याच्यासारखा खेळण्याचा प्रयत्न करेल पण माझी बॅटींग करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. मात्र मनगटाच्या ताकदीवर सिक्स मारण्याची त्याच्याकडे खास क्षमता आहे. काही खेळाडूंमध्येच अशी कला पाहायला मिळत असल्याचं ग्लेन फिलिप्सन म्हणाला.
माझी आणि सुर्याची बलस्थानं वेगवेगळी असून दोघेही आमच्या पद्धतीने काम करतो. टी-20 मध्ये यशस्वी व्हायचं असेल तर जोखीम पत्कारावी लागते आणि आम्ही त्यामुळेच यशस्वी झालो असल्याचं फिलिप्स म्हणाला.
सुर्यकुमारने या वर्षात 43 च्या सरासरीने आणि 186च्या स्ट्राइक-रेटने 1040 धावा केल्या आहेत. यंदाच्या वर्षी टी-20 फॉरमॅटमध्ये तो जगातील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. तर फिलिप्सने यंदाच्या वर्षी 158 पेक्षा जास्त सरासरीने 650 धावा केल्या आहेत. फिलिप्स ICC च्या क्रमवारीमध्ये आठव्या स्थानावर आहे.