close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

वर्ल्ड कप खेळायचा असेल तर हे काम कर, भज्जीचा जडेजाला सल्ला

भारताचा ऑफ स्पिनर हरभजन सिंगनं रवींद्र जडेजाला वर्ल्ड कपसाठी सल्ला दिला आहे.

Updated: Feb 5, 2019, 08:01 PM IST
वर्ल्ड कप खेळायचा असेल तर हे काम कर, भज्जीचा जडेजाला सल्ला

मुंबई : भारताचा ऑफ स्पिनर हरभजन सिंगनं रवींद्र जडेजाला वर्ल्ड कपसाठी सल्ला दिला आहे. वर्ल्ड कपच्या टीममध्ये जडेजाची निवड होईल, पण फक्त फिंगर स्पिनर (बोटांनी बॉल वळवणारा) म्हणून टीममध्ये जागा टिकवून ठेवायची असेल, तर त्याला सुधार करावा लागेल, असं मत हरभजननं व्यक्त केलं आहे. मनगटानं बॉल वळवणारे कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल मागच्या १८ महिन्यांपासून भारताच्या वनडे आणि टी-२० टीमचे मुख्य सदस्य बनले आहेत. यामुळे जडेजा आणि अश्विन यांना टीममध्ये जागा मिळवणं मुश्किल झालं आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये जडेजाला अंतिम-११ खेळाडूंमध्ये संधी मिळाली नाही. पण वर्ल्ड कपच्या टीममध्ये जडेजाची निवड होईल, असा विश्वास हरभजननं व्यक्त केला आहे.

'जडेजा इंग्लंडमध्ये यशस्वी होईल'

'२०१७ सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये इंग्लंडमधलं वातावरण गरम होतं, तसंच वातावरणात आद्रताही जास्त होती. यावेळीही तसंच वातावरण असलं, तर जडेजाचा चांगल्या पद्धतीनं वापर केला जाऊ शकतो. जर प्रतिस्पर्धी टीममध्ये पाच-सहा उजव्या हाताचे बॅट्समन असतील, तर जडेजाला टीममध्ये घेतलं जाऊ शकतं. जडेज सहाव्या क्रमांकावर आणि हार्दिक पांड्या सातव्या क्रमांकावर बॅटिंग करु शकतो, असं हरभजन म्हणाला.'

स्पिनरमध्ये फरक काय?

'बोटांनी बॉल वळवणाऱ्या स्पिनरना खेळणं सोपं असतं. या बॉलरकडे जर 'दुसरा'चा पर्याय नसेल, तर चांगला बॅट्समन तुमच्या बॉलिंगचा अंदाज घेईल आणि मोठे शॉट मारेल. ऑस्ट्रेलियाचा नॅथन लायन हे याचं उत्तम उदाहरण आहे. लायन वनडे क्रिकेटमध्ये संघर्ष करताना दिसतो. तुम्ही मनगटानं बॉल वळवणारे स्पिनर असाल तर तुमच्याकडे लेग स्पिन, गुगली आणि फ्लिपर हे तीन पर्याय असतात, अशावेळी बॅट्समनना तुम्ही कोणता बॉल टाकणार आहात, हे कळणं कठीण होतं', असं हरभजननं सांगितलं.

'मनगटानं बॉल वळवणाऱ्या स्पिनरविरुद्ध खेळताना जगातल्या बॅट्समनचं प्रदर्शन खराब होत आहे. स्पिनरना त्यांच्या हाताकडे बघून बॉलचा अंदाज घेणारे कमी बॅट्समन आहेत. पण कुलदीप आणि चहलनं सातत्यानं चांगली बॉलिंग केली आहे. जवळपास ४० मॅचमधली त्यांची कामगिरी बघितली तर त्यांनी टप्पा योग्य ठेवला आहे, असं वक्तव्य हरभजननं केलं.'