VIDEO : एकाच जर्सीसाठी रैन्ना - भज्जी भिडले

असं काय आहे या जर्सीत

VIDEO : एकाच जर्सीसाठी रैन्ना - भज्जी भिडले

मुंबई : हरभजन सिंह आयपीएल 2018 मध्ये चैन्नईच्या संघात आहे. चैन्नईच्या संघात गेल्यानंतर हरभजन सिंहने आपली जर्सी देखील बदलून घेतली. भारीतय संघात मुख्य स्पिनर असलेला हा खेळाडू आता नव्या भूमिकेत आणि नव्या आव्हानांसाठी सज्ज झाला आहे. आता हरभजन टॉक शोमध्ये सहभागी झाला आहे. क्विक हिल भज्जी विद सीएसके नावाच्या टॉक शोमध्ये भारताकडून अनेक टॉप क्रिकेटर्सचा सहभाग आहे. या शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये हरभजन सिंह चैन्नईतील आपला साथीदार सुरेश रैनाचा समावेश आहे. 

या टॉक शोमध्ये भरपूर मस्ती केली जात आहे. दोघांनी भरपूर मुद्यांवर चर्चा केली आहे. सुरूवातीला हरभजन सिंह अँकरिंग करताना थोडासा नर्वस होत होता मात्र सुरेश रैनाने त्याची हिंम्मत वाढवली आहे. असं सगळ असताना देखील हरभजन आणि रैनामध्ये तीन नंबरच्या जर्सीवरून वाद झाला. दोघांनी 3 नंबरची जर्सी घातली आहे. 

हरभजन आणि रैनामध्ये हे आहे साम्य

जर्सीप्रमाणेच हरभजन सिंह आणि रैनामध्ये अनेक समानता असल्याचं देखील त्याने सांगितलं. जसं की दोघांच निकनेम सोनू आहे. हरभजनने सांगितलं की, जेव्हा पण क्रिकेटरची मुलाखत घेतली जाते तेव्हा काही क्रिकेटर्स हे भरपूर ग्रेसफुस कूल दिसतात. मात्र ड्रेसिंग रूमची दुनिया ही वेगळी आहे. या शोच्या माध्यमातून मी क्रिकेटर्सच्या चाहत्यांसमोर काही खास गोष्टी समोर ठेवणार आहेत. ज्या त्यांनी कधीच ऐकल्या नसतील आणि अनुभवल्या देखील नसतील.