मुंबई: क्रिकेटच्या मैदानात जसे फील्डिंग दरम्यान किस्से घडत असतात तसेच मैदानाबाहेर किंवा सरावा दरम्यानही अनेक गमती-जमती होत असतात. टीम इंडियाच्या खेळाडूंमध्ये कोणाला बकरा करायचं याची चर्चा होते. सगळ्यांनी मिळून चक्क दादाला एप्रिल फूल करायचं ठरवलं आहे.
इरफान पठान आणि भज्जीने देखील आपल्या मुलाखतीमध्ये हा किस्सा सांगितला आहे. जो टीम इंडियातील प्रत्येक खेळाडू कधीही विसरू शकणार नाही. टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्यासोबत युवी आणि भज्जीने मिळून हा प्रॅन्क केला होता.
भज्जी आणि युवीने मिळून काही बनावट कात्रण तयार केली. त्या कात्रणांमुळे सौरव गांगुली आणि भज्जीमध्ये खूप वाद झाला. भज्जी आणि इतर काही खेळाडूंबद्दल खोटं विधान केल्याचं सर्वांनी गांगुली यांना सांगितलं आणि सराव सामन्यातून निघून जाण्याची धमकी दिली.
सौरव गांगुली यांचं बोलतीच बंद झाली. त्यांना नेमका हा प्रकार काय ते कळेना. बराच वेळ खेळाडूंनी त्यांची मजा घेतल्यानंतर मग सगळा प्रकार भज्जी आणि युवीने सांगितला. एक एप्रिलसाठी टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीलाच मिळून सर्वांनी एप्रिल फूल केलं होतं.