जेव्हा शिखर धवन चक्क रिक्षा चालवतो...

भारतीय क्रिकेट टीम आजकाल सोशल मिडीयावर खूपच अ‍ॅक्टीव्ह असते.

Updated: Aug 16, 2017, 06:47 PM IST
जेव्हा शिखर धवन चक्क रिक्षा चालवतो...  title=

मुंबई : भारतीय क्रिकेट टीम आजकाल सोशल मिडीयावर खूपच अ‍ॅक्टीव्ह असते.

ट्विटर आणि इंस्टाग्रामवर ड्रेसिंग रूममधील धमाल, दौर्‍याच्या प्रवासादरम्यानचे काही क्षण सतत अकाऊंटवर शेअर केले जातात. 

श्रीलंकेमध्ये भारतीय संघाने दमदार कामगिरी केल्यानंतर आता खेळाडू तेथे मज्जा देखील करत आहे. शिखर धवनने नुकताच असा एक व्हिडीयो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. 

 

Daddy D di Auto Rickshaw Ride @hardikpandya93

A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial) on

 

या व्हिडियोमध्ये शिखर धवन श्रीलंकेच्या रस्स्त्यावर रात्री चक्क रिक्षा चालवताना दिसत आहे. शिखरच्या सोबत पाठच्या सीट हार्दीक पांड्यादेखील आहे. एका पंजाबी गाण्यावर रात्री हे दोन्ही फलंदाज मज्जा करताना दिसत आहेत.  या व्हिडीयोला जवळपास ९० हजाराहून अधिक लोकांनी पाहिले आहे.