Viral Video: नवरदेव पांड्याला मेहुण्यांचा गराडा; बुटांच्या बदल्यात मागितली गडगंज रक्कम, हार्दिकनं अशी केली बोलती बंद

Ceremony of stealing shoes in marriage: हार्दिक पांड्या  (Hardik Pandya) आणि  नताशा स्टॅनकोविच  त्यांच्या लव्हस्टोरीमुळे नेहमी चर्चेत राहिले आहेत. व्हॅलेंटाईन डे दिवशी दोघांनी साताजन्माच्या गाठी बांधल्या. हार्दिकने त्याच्या लग्न समारंभात श्रीमंतीचा थाट दाखवला. 

Updated: Jun 19, 2023, 04:11 PM IST
Viral Video: नवरदेव पांड्याला मेहुण्यांचा गराडा; बुटांच्या बदल्यात मागितली गडगंज रक्कम, हार्दिकनं अशी केली बोलती बंद title=
Hardik Pandya marriage Video

Hardik Pandya Viral Video: टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि अभिनेत्री नताशा स्टॅनकोविच (Natasa Stankovic) लग्नबंधनात अडकले होते. 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाइन्स डेच्या (valentine day 2023) दिवशी त्यांनी पुन्हा लग्न केलं होतं. राजस्थानमध्ये त्यांचा हा शाही विवाहसोहळा पार पडला. त्याआधी त्याने ख्रिश्चन पद्धतीने लग्नसोहळा उरकला होता. तीन दिवसात दोन धार्मिक पद्धतीने दोघांनी लग्न केलं होतं. अशातच त्याच्या लग्नातील एक व्हिडिओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हार्दिक पांड्या  (Hardik Pandya) आणि  नताशा स्टॅनकोविच  त्यांच्या लव्हस्टोरीमुळे नेहमी चर्चेत राहिले आहेत. व्हॅलेंटाईन डे दिवशी दोघांनी साताजन्माच्या गाठी बांधल्या. हार्दिकने त्याच्या लग्न समारंभात श्रीमंतीचा थाट दाखवला. सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या (Krunal Pandya) दोन्ही भाऊ दिसत आहेत. लग्नात नवरदेवाचे बुट आणि कट्ट्यार चोरण्याची पद्धत असते. अशाच काहीसा प्रकार हार्दिकच्या लग्नात देखील पहायला मिळाला. त्याचाच व्हिडिओ सध्या ट्रेंडमध्ये (Trending Video) आहे.

आणखी वाचा - Hardik Pandya लवकरच घेणार निवृत्ती? कर्णधाराच्या विधानाने एकच खळबळ

लग्नात हार्दिक पंड्याचे बूट चोरल्यानंतर (ceremony of stealing shoes in marriage) मेहुण्यात मोठ्या रकमेची मागणी करतात. आपल्याकडे सहसा 10 हजारापर्यंत मागणी केली जाते. मात्र, मिळतात किती? हजार नाहीतर 2 हजार... मात्र, हार्दिककडे 1 लाख 1 रुपयाची मागणी केली गेली. तेव्हा हार्दिकने 5 लाख 1 रुपये देणार असल्याचं जाहीर केलं आणि लगेच पैसे ट्रान्सफर करणार असल्याचं सांगितलं. हार्दिकने जाहीर करताच अनेकांनी टाळ्या वाजवल्या. त्यावेळी परदेशी पाहुण्यांना हार्दिकने हे माझ्याकडून बुटांच्या जोड्यासाठी 7 हजार डॉलर मागत असल्याचं सांगितलं.

पाहा Video

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by (@rockstar_hardikz_world)

दरम्यान, सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान (Video Viral) शेअर केला जात असल्याचं दिसतंय. नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर अनेक भन्नाट कमेंट केल्या आहेत. पाच लाखात आमच्याकडे पूर्ण लग्न होतंय पांड्या भाऊ, असं काहींनी म्हटलं आहे. तर पांड्या नुसती हवा करतोय, असं काही सोशल मीडिया युझर्सने म्हटलं आहेत. तर काहींनी पांड्या बर्दर्सचं कौतूक देखील केलंय.