Hardik Pandya लवकरच घेणार निवृत्ती? कर्णधाराच्या विधानाने एकच खळबळ

हार्दिक पांड्या (Hardik Pandya) सध्याच्या घडीला टीमच्या प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे. तो फलंदाजीसोबत पाचव्या गोलंदाजाचीही भूमिका पार पाडतो.

Updated: Feb 4, 2023, 04:08 PM IST
Hardik Pandya लवकरच घेणार निवृत्ती? कर्णधाराच्या विधानाने एकच खळबळ title=

Hardik Pandya might retire from Test : भारतीय टीमचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) ला न्यूझीलंडच्या टी-20 सिरीजमध्ये कर्णधारपदाची (Captain Hardik Pandya) जबाबदारी सोपवण्यात आली होती. ज्यामध्ये त्याने चांगली भूमिका करत सिरीज भारताच्या नावे केली. या सिरीजमध्ये पंड्याने फलंदाजी आणि गोलंदाजी यांच्यामध्ये उत्तम कामगिरी केली. त्याच्या या उत्तम कामगिरीच्या जोरावर त्याला 'मॅन ऑफ द सीरीज' घोषित करण्यात आलं. मात्र अशातच आता हार्दिक पंड्याने एक मोठं विधान केलं आहे.

Hardik Pandya घेणार निवृत्ती?

हार्दिक पांड्या (Hardik Pandya) सध्याच्या घडीला टीमच्या प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे. तो फलंदाजीसोबत पाचव्या गोलंदाजाचीही भूमिका पार पाडतो. मात्र यावेळी प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये हार्दिकने अशी एक घोषणा केली आहे, ज्यामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसू शकतो. 

न्यूझीलंड सिरीजचा शेवटचा सामना जिंकल्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्या प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये बोलताना म्हणाला, "सध्या मी वनडे आणि टी-20 क्रिकेट फॉर्मेटमध्ये जास्त लक्ष देण्याचा विचार करतोय. हा विचार करणं गरजेचं आहे. वेळ आणि शरीर ठीक असेल तर याचा योग्य पद्धतीने विचार केला जाऊ सकतो."

हार्दिकच्या एकंदरीत वक्तव्यावरून तो टेस्ट क्रिकेटमध्ये कमबॅक करण्याच्या विचारात नाही. जर हार्दिक पंड्या असा विचार करत असेल तर टीम इंडियासाठी तो मोठा झटका असेल.

शेवटचा कसोटी सामना कधी खेळला

याच वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतामध्ये एकदिवसीय क्रिकेटची विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तर 2024 मध्ये टी-20 विश्वचषक स्पर्धा कॅरेबियन बेटांवर खेळवली जाणार आहे. मर्यादीत षटकांच्या क्रिकेटला माझं प्राधान्य आहे असं हार्दिकने सांगितलं. कसोटी क्रिकेटऐवजी सध्या आपण व्हाइट बॉल क्रिकेटवर लक्ष केंद्रित केलं आहे. 2019 मध्ये हार्दिकच्या पाठीची शस्त्रक्रीय झाल्यापासून तो कसोटी सामने खेळलेला नाही. 2018 मध्ये साऊथहॅम्पटनमध्ये तो शेवटचा कसोटी सामना खेळला होता. याच वर्षी तो त्याचा शेवटचा रणजी सामनाही खेळला होता.