Hardik Pandya ने केली Cheating? हिट विकेट ठरल्यानंतर हळूच बेल्स उचलले आणि...

हार्दिक पुन्हा एकदा अपयशी ठरला. मात्र या खेळीदरम्यान हार्दिकने गपचुप केलेलं कृत्य कॅमेरात मात्र कैद झालंच. 

Updated: Nov 6, 2022, 10:27 PM IST
Hardik Pandya ने केली Cheating? हिट विकेट ठरल्यानंतर हळूच बेल्स उचलले आणि... title=

T20 world cup 2022 : मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर झालेल्या सामन्यात आज टीम इंडियाने झिम्बाब्वेला धुळ चारली. या सामन्यात पुन्हा एकदा सुर्यकुमार यादवची बॅट तळपली. तर दुसरीकडे हार्दिक पंड्याने 18 रन्सची खेळी केली. मोठी खेळी करण्यात हार्दिक पुन्हा एकदा अपयशी ठरला. मात्र या खेळीदरम्यान हार्दिकने गपचुप केलेलं कृत्य कॅमेरात मात्र कैद झालंच. इतकंच नाही तर हार्दिक पंड्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

भारतीय टीम फलंदाजी करताना ही घटना घडली. हार्दिक फलंदाजी करत असताना त्याची बॅट बेल्सला लागली आणि बेल्स खाली पडले. हार्दिकच्या ही गोष्ट लक्षात येताच त्याने हळूच बेल्स उचलून पुन्हा स्टंपवर ठेवले. मात्र ही घटना कॅमेरात कैद झाली आणि याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतेय.

ही घटना पाहून लोकांना वाटेल की हार्दिकने चिटींग केली. मात्र असं अजिबात नाहीये. ही घटना घडली 20 व्या ओव्हरमध्ये. यावेळी रिचर्ड नागरवा ओव्हर टाकत होता. ओव्हरमधील पहिला बॉल नो बॉल असल्यामुळे हार्दिकला दुसऱ्या बॉलवर फ्री हिट मिळाली. या बॉलवर हार्दिक बॉल जोरात मारण्याच्या नादात बेल्स पाडवून बसला. मात्र, नियमांनुसार फलंदाज फ्री हिटवर बाद होऊ शकत नाही. यामुळेच हार्दिकने शांतपणे बेल्स उचलून पुन्हा विकेटवर ठेवल्या.

पुढच्याच बॉलवर हार्दिक आऊट 

फ्री हिटवर पंड्याला जीवदान मिळालं खरं पण त्याचा जास्त फायदा हार्दिक घेऊ शकला नाही. झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज रिचर्ड नागरवाने नो बॉल आणि फ्री हिट बॉल टाकल्यानंतर पुढच्याच बॉलवर हार्दिकला वाईड यॉर्कर टाकला. यावेळी हार्दिक कॅच आऊट झाला. हार्दिक 18 बॉलमध्ये 18 रन्स करून आऊट झाला.

टीम इंडियाचा विजय

टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाची (Team India) सुरूवात चांगली झाली. मात्र, कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) लवकर बाद झाला. विराट आणि रोहितने जबाबदारीने खेळत झिम्बाब्वेचं रान उठवलं. जोरदार फटकेबाजी करत राहूलने अर्धशतक साजरं केलं. तर त्यानंतर आलेल्या सुर्यकुमारने (Suryakumar) देखील धमाकेदार अंदाजात 25 चेंडूत 61 धावा केल्या. यावेळी त्यानं 6 चौकार तर 4 षटकार खेचले.

टीम इंडियाने दिलेल्या 187 धावांचा पाठलाग करताना झिम्बाब्वेची सुरूवात चांगली झाली नाही. सलामीवीर वेसली माधवेरे पहिल्याच बॉलवर बाद झाला. तर रेजिस चकाबवा याला देखील भोपळा फोडता आला नाही. कालांतराने झिम्बाब्वेची फलंदाजी ढासळत गेली. अखेरच्या 4 षटकात झिम्बाब्वेला 80 धावांची गरज होती. मात्र, अखेर झिम्बाब्वेचा 71 धावांनी पराभव झाला आहे.