Video : विराट-धोनीला मागे टाकणारा हार्दिक पांड्यावर पंजाबचा हा मंत्री 'भारी'

टीम इंडियाचा युवा अष्टपैलू हार्दिक पांड्याने काल आक्रमक शतकी खेळी करताना कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला मागे टाकले. त्याने काल अनेक विक्रमांना गवसणी घातली. त्यात कसोटी क्रिकेटमध्ये भारतातर्फे एका षटकात फटकावल्या गेलेल्या सर्वाधिक धावांच्या विक्रमाचाही समावेश आहे. त्याने  ९६चेंडूत १०८ धावांची शानदार खेळी केली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 14, 2017, 02:56 PM IST
Video : विराट-धोनीला मागे टाकणारा हार्दिक पांड्यावर पंजाबचा हा मंत्री 'भारी' title=

कोलंबो : टीम इंडियाचा युवा अष्टपैलू हार्दिक पांड्याने काल आक्रमक शतकी खेळी करताना कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला मागे टाकले. त्याने काल अनेक विक्रमांना गवसणी घातली. त्यात कसोटी क्रिकेटमध्ये भारतातर्फे एका षटकात फटकावल्या गेलेल्या सर्वाधिक धावांच्या विक्रमाचाही समावेश आहे. त्याने  ९६चेंडूत १०८ धावांची शानदार खेळी केली.

पांड्याने भारताच्या डावातील ११६ व्या षटकात मलिंडा पुष्पकुमाराच्या पहिल्या दोन चेंडूंवर चौकार वसूल केले. त्यानंतर पुढच्या तीन चेंडूंवर त्याने षटकार ठोकले. पांड्याने या षटकात एकूण २६ धावा फटकावल्या. भारतातर्फे हा नवा विक्रम आहे. त्याने संदीप पाटील आणि कपिलदेव यांचा विक्रम मोडला. त्यांनी एका षटकात २४ धावा वसूल केल्या होत्या. मात्र, त्याने ब्रायन लाराचा विक्रम मोडला नाही. त्याच्या नावावर २८ धावा आहेत.

संदीप पाटीलने १९८२ मध्ये मँचेस्टरमध्ये इंग्लंडचा वेगवान गोलंदाज बॉब विलिसच्या एका षटकात ६चौकार लगावले होते, तर कपिलने १९९० मध्ये लॉर्डस् मैदानावर एडी हॅमिंग्सच्या षटकातील अखेरच्या चार चेंडूंवर ४  षटकार ठोकले होते.

पांड्यापूर्वी न्यूझीलंडचा क्रेग मॅकमिलन, लारा, ऑस्ट्रेलियाचा मिशेल जॉन्सन आणि न्यूझीलंडचा ब्रॅन्डन मॅक्युलम यांनी एका षटकात २६ धावा वसूल केल्या आहेत. पांड्याने सलग तीन चेंडूंवर षटकार लगावले. कसोटी क्रिकेटमध्ये सलग तीन षटकार ठोकणारा तो तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. 

यापूर्वी कपिलदेव व महेंद्रसिंह धोनी यांनी अशी कामगिरी केली आहे. कपिलने हॅमिंग्सच्या गोलंदाजीवर सलग चार षटकार लगावले होते, तर धोनीने २००६ मध्ये अँटिग्वामध्ये डेव्ह मोहम्मदच्या गोलंदाजीवर तीन षटकार ठोकले होते.

नवज्योत सिंग सिधूचा मोडला नाही विक्रम पांड्याने

Hardik Pandya Navjot singh sidhu

हार्दिक पांड्याने आपल्या कामगिरीने  अनेकांना मागे टाकले मात्र, पंजाब मंत्रिमंडळात असणाऱ्या नवज्योत सिंग सिधूचा तो विक्रम मोडू शकलेला नाही. ७ षटकार ठोकणारा हार्दिक पांड्या हा वीरेंद्र सेहवाग आणि हरभजन सिंग यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र, पहिल्या क्रमांकावर नवज्योत सिंग सिधू आहे. सिधूने एका कसोटीत ८ छक्के मारलेत. हा विक्रम १९९४ मध्ये श्रीलंकाविरुद्ध लखनऊ येथे केलाय. सेहवागने २००९ मध्ये श्रीलंकेविरुद्ध आणि हजभजन सिंगने २०१०मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळताना केलाय.