'आशिया कप'मध्ये टीम इंडियाला मोठा झटका, तीन खेळाडू 'आऊट'

भारतीय टीममध्ये तीन बदल करण्याचा निर्णय

Updated: Sep 20, 2018, 03:13 PM IST
'आशिया कप'मध्ये टीम इंडियाला मोठा झटका, तीन खेळाडू 'आऊट' title=

मुंबई : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड अर्थात बीसीसीआयच्या वरिष्ठ समितीनं दुबईमध्ये सुरू असलेल्या 'आशिया कप' टूर्नामेंटमध्ये खेळणाऱ्या भारतीय टीममध्ये तीन बदल करण्याचा निर्णय घेतलाय. या बदलांतर्गत टीममधून तीन जखमी खेळाडूंना 'आऊट' करण्यात आलंय. हार्दिक पांड्या, अक्षर पटेल आणि शार्दुल ठाकूर यांना आशिया कपमधून बाहेर करण्यात आलंय. गुरुवारी बीसीसीआयनं ही माहिती दिली. 

'भारतीय टीममध्ये हार्दिक, अक्षर आणि शार्दुल यांच्या जागेवर आशिया कपसाठी दीपक चाहर, रवींद्र जडेजा आणि सिद्धार्थ कौल यांचा समावेश करण्यात आलाय' असं बीसीसीआयनं म्हटलंय. 

'हार्दिकला पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या मॅचमध्ये पाठीला जखम झाली होती. बीसीसीआयची मेडिकल टीम त्याची तपासणी करतेय. परंतु, या जखमेमुळे उर्रित आशिय कप टूर्नामेंटमध्ये भारतीय टीमसोबत तो खेळू शकणार नाही' असं बोर्डानं म्हटलंय. 

अक्षरलाही पाकिस्तानविरुद्ध मॅचमध्ये फिल्डींगदरम्यान डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली होती. हाताच्या स्कॅनिंगनंतर आशिया कपमधून त्याला बाहेर करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

तर हाँगकाँग विरुद्ध खेळण्यात आलेल्या पहिल्या मॅच दरम्यान शार्दुलला उजव्या बाजुला कंबरेच्या खालच्या भागात दुखापत झाली. यामुळे, तोदेखील आशिया कपमध्ये खेळू शकणार नाही. त्याच्याऐवजी सिद्धार्थला टीममध्ये जागा देण्यात आलीय.