भारताने मॅच जिंकली आणि 'या' पाकिस्तानी मुलीने भारतीयांची मनं जिंकली

 या पाकिस्तानी मुलीच्या सौंदर्याचे भारतातही चाहते झाले आहेत.

Updated: Sep 20, 2018, 03:58 PM IST
भारताने मॅच जिंकली आणि 'या' पाकिस्तानी मुलीने भारतीयांची मनं जिंकली title=

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानची मॅच नेहमीच रोमहर्षक असते. आशिया कप 2018 मध्येही भारत पाक मॅचकडे सर्वांच लक्ष लागून राहिलं होतं. भारताच्या शानदार बॉलिंग माऱ्यापुढे पाकिस्तानी बॅट्समन तग धरु शकले नाहीत आणि त्यांना 8 विकेट्सनी हार पत्करावी लागली.

फोटो व्हायरल 

 या मॅचनंतर पाकिस्तानी मुलीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या पाकिस्तानी मुलीच्या सौंदर्याचे भारतातही चाहते झाले आहेत. भारताने मॅच जिंकली असली तरी पाकिस्तानी फॅन असलेल्या मुलीने आपल्या सौंदर्याने भारतीयांची मनं जिंकली आहेत. 

आशिया कपच्या मॅचमध्ये भारतानं पाकिस्तानवर 8 विकेटनी दणदणीत विजय मिळवला आहे. पाकिस्ताननं ठेवलेल्या 163 रनचा पाठलाग भारतानं 2 विकेट गमावून 29 ओव्हरमध्ये केला. कर्णधार रोहित शर्मानं सर्वाधिक 52 रन केले. तर हाँगकाँगविरुद्ध शतक करणारा शिखर धवन 46 रन्सवर आऊट झाला.

पाक 162 वर ऑलआऊट

अंबाती रायुडू आणि दिनेश कार्तिक प्रत्येकी 31 रनवर नाबाद राहिले. पाकिस्तानच्या शादाब खाननं एक तर फईम अश्रफनं एक विकेट घेतली. त्याआधी टॉस जिंकून पहिले बॅटिंग करणाऱ्या पाकिस्तानच्या बॅट्समननी भारतीय बॉलरपुढे लोटांगण घातलं. पाकिस्तानची टीम 162 रनवर ऑल आऊट झाली. पाकिस्तानच्या पहिल्या 2 विकेट 3 रनवरच गेल्या. यानंतर बाबर आझम आणि शोएब मलिकनं पाकिस्तानचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

पण भारतीय बॉलरनी पाकिस्तानला वारंवार धक्के दिले. भारताकडून भुवनेश्वर कुमार आणि केदार जाधवनं प्रत्येती 3-3 विकेट घेतल्या. तर जसप्रीत बुमराहला 2 विकेट घेण्यात यश आलं. स्पिनर कुलदीप यादवनं 1 विकेट घेतली. पाकिस्तानच्या बाबर आझमनं सर्वाधिक 47 रन केले. तर शोएब मलिक 43 रन करून रन आऊट झाला.