GT vs MI : मुंबई सोडा अहमदाबादच्या प्रेक्षकांनी पांड्याला डिवचलं, टॉससाठी मैदानात आल्यावर काय झालं पाहा...Video

Hardik Pandya booed by Ahmedabad crowd : टॉसवेळी हार्दिक पांड्याला जेव्हा मैदानात आला, तेव्हा प्रेक्षकांनी (GT vs MI 5th Match) हार्दिक पांड्यावर तीव्र नाराजी व्यक्त केल्याचं दिसून आलं.

सौरभ तळेकर | Updated: Mar 24, 2024, 08:13 PM IST
GT vs MI : मुंबई सोडा अहमदाबादच्या प्रेक्षकांनी पांड्याला डिवचलं, टॉससाठी मैदानात आल्यावर काय झालं पाहा...Video title=
Hardik Pandya booed by Ahmedabad crowd

Gujarat Titans vs Mumbai Indians : अहमदाबादमध्ये गुजरातविरुद्धच्या आयपीएलच्या सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. टॉसच्या वेळी बोलताना हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) गुजरातच्या चाहत्यांचे आभार मानले. मात्र, टॉसवेळी हार्दिक पांड्याला प्रेक्षकांच्या नाराजीला सामोरं जावं लागलं. रवी शास्त्री यांनी हार्दिक पांड्याचं नाव घेताच प्रेक्षकांनी पांड्याला डिवचलं. त्याचा व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हार्दिक पांड्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. 

काय म्हणाला हार्दिक पांड्या?

खेळपट्टी पाहता अन् हवामानाचा आणि मैदानावरील दव याचा अंदाज बांधता आम्ही गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे, असं हार्दिक पांड्याने सांगितलं. माझी जन्मभूमी गुजरात आहे, गुजरातमध्ये खूप यश मिळालं, इथले प्रेक्षक आणि या राज्याचे खूप आभारी आहे. माझा क्रिकेटचा जन्म मुंबईत झाला, म्हणून परत आल्यावर खूप आनंद झाला, असं हार्दिक पांड्याने म्हटलं आहे.

सूर्यकुमार यादव अनफिट असल्याने त्याचा प्लेईंग ईलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला नाही. तर दुखापतीनंतर जसप्रीत बुमराह याचं 1 वर्षानंतर आयपीएलमध्ये कमबॅक झालंय. मागील वर्षी हार्दिक पांड्या गुजरातचा कॅप्टन होता. आता पांड्या मुंबईचा कॅप्टन आहे, अशातच त्याला पहिल्याच सामन्यात गुजरातशी दोन हात करावे लागत आहेत. आयपीएलच्या इतिहासात मुंबई आणि गुजरात दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध 4 वेळा आमनेसामने भिडले आहेत. यामध्ये मुंबई आणि गुजरात दोघांनी प्रत्येकी 2-2 सामने जिंकले आहेत. त्यामुळे आता बरोबरीचं गणित कोणाच्या बाजूने झुकणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा, इशान किशन, तिलक वर्मा, नमन धीर, हार्दिक पांड्या (C), टिम डेव्हिड, शम्स मुलानी, पियुष चावला, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह, ल्यूक वुड.

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): शुभमन गिल (C), रिद्धिमान साहा, साई सुधारसन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, रशीद खान, उमेश यादव, रविश्रीनिवासन साई किशोर, स्पेन्सर जॉन्सन.