RR vs LSG : राजस्थानने वाजवले विजयाचे नगाडे, लखनऊचा 20 धावांनी पराभव; कॅप्टन संजू चमकला!

RR beat LSG In 4th Match : राजस्थान रॉयल्सने लखनऊ सुपर जायन्ट्सचा 20 धावांनी पराभव केला आहे. संजू सॅमसनने 82 धावांची उल्लेखनिय खेळी केली. तर लखनऊकडून निकोलस पूरनने नॉट आऊट 64 धावा केल्या.

सौरभ तळेकर | Updated: Mar 24, 2024, 07:33 PM IST
RR vs LSG : राजस्थानने वाजवले विजयाचे नगाडे, लखनऊचा 20 धावांनी पराभव; कॅप्टन संजू चमकला! title=
IPL 2024, RR vs LSG

Rajasthan Royals vs Lucknow Super Giants : राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर किंग्ज यांच्यात आयपीएलचा 4 था सामना खेळवला गेला. या सामन्यात राजस्थानने लखनऊचा पराभव करून पहिल्या विजयाचा नगाडा वाजवला आहे. कॅप्टन संजू सॅमसन याच्या दमदार 82 धावांच्या खेळीमुळे राजस्थानचा विजय सोपा झाला. लखनऊकडून निकोलस पूरनने आक्रमक फलंदाजी केली. मात्र, त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही. संदीप शर्मा आणि आवेश खान यांनी अखेरच्या ओव्हरमध्ये फलंदाजाचे सुर आवळले अन् राजस्थानने आपलं खातं उघडलं आहे. 

राजस्थान रॉयल्सने प्रथम टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. राजस्थानला जॉस बटलरच्या रुपात पहिला धक्का बसला. बटलरला खास कामगिरी करता आली नाही. तो केवळ 11 धावा करत बाद झाला. मात्र, कॅप्टन संजू सॅमसनने संघाची धावसंख्या पुढे नेली अन् लखनऊच्या फलंदाजांचा बाजार उठवला. संजूने एकहाती फलंदाजी केली अन् संघाला 200 पार करण्याचा प्रयत्न केला. तर यशस्वी जयस्वाल आणि रियान पराग यांनी आक्रमक फलंदाजी करत गोलंदाजांना चोप दिला. रियानने 29 बॉलमध्ये 43 धावांची खेळी केली अन् ध्रुव जुरैलने 12 बॉलमध्ये 20 धावा कुटल्या. त्यामुळे राजस्थानला 193 चा आकडा गाठता आला. 

लखनऊ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): केएल राहुल (C), क्विंटन डी कॉक, देवदत्त पडिककल, आयुष बडोनी, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, कृणाल पंड्या, रवी बिश्नोई, मोहसिन खान, नवीन-उल-हक, यश ठाकूर.

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (C), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, संदीप शर्मा, आवेश खान, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल.