ख्रिसमच्या मुहूर्तावर हार्दिक पंड्याकडून पत्नीसोबत फोटो शेअर, लवकरच मिळणार गुडन्यूज?

ख्रिसमच्या मुहूर्तावर हार्दिक पंड्याच्या चाहत्यांसाठी सर्वात मोठी बातमी

Updated: Dec 26, 2021, 04:20 PM IST
ख्रिसमच्या मुहूर्तावर हार्दिक पंड्याकडून पत्नीसोबत फोटो शेअर, लवकरच मिळणार गुडन्यूज? title=

मुंबई: ख्रिसमसच्या सेलिब्रेशनचे फोटो अभिनेत्यांपासून ते क्रिकेटर्सपर्यंत अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये सध्या चर्चा आहे ती हार्दिक पांड्याच्या फोटोची. हार्दिक पांड्याने आपल्या कुटुंबासोबत शेअर केलेल्या फोटोमुळे सोशल मीडियावर चाहत्यांनी त्याला प्रश्नांची सरबत्ती सुरू केली आहे. 

हार्दिक पांड्याने अभिनेत्री नताशासोबतचा फोटो शेअर केला. यावेळी नताशा पुन्हा आई होणार का या चर्चांना उधाण आलं. नताशा पुन्हा प्रेग्नंट असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. यामागंच कारण म्हणजे तिचा ड्रेस आणि तिचं दिसणारं पोट होतं. 

हार्दिक आणि नाताशाचा फोटो सोशल मीडियावर तुफान चर्चेचा विषय बनला आहे. या फोटोमध्ये नताशाचं बेबी बंप दिसत आहे. अनेक चाहत्यांनी दुसऱ्यांदा हार्दिक पांड्या बाबा होणार का? असा प्रश्न विचारला आहे. 

अगस्तया नताशा आणि हार्दिकने ख्रिसमसचं खास सेलिब्रेशन घरी केलं. यावेळी त्याने आपल्या कुटुंबासोबतचे काही खास क्षण सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.