हार्दिक पाड्यांच्या या घड्याळ्याची जोरदार चर्चा, किंमत ऐकूण तुम्हालाही आश्चर्य वाटेल

Hardik pandya च्या घड्याळ्याची किंमत इतक्या कोटींमध्ये...

Updated: Aug 24, 2021, 09:39 PM IST
हार्दिक पाड्यांच्या या घड्याळ्याची जोरदार चर्चा, किंमत ऐकूण तुम्हालाही आश्चर्य वाटेल title=

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्याने आपल्या कारकिर्दीत अतिशय कमी वेळात यश मिळवले आहे. हार्दिक पंड्या आलिशान जीवन जगण्यासाठी ओळखला जातो. हार्दिक पांड्याने खूप कमी वेळात जागतिक क्रिकेटमध्ये भरपूर संपत्ती आणि कीर्ती मिळवली आहे. हार्दिक पांड्या आता आयपीएल 2021 च्या उर्वरित सामन्यांसाठी दुबईला पोहोचला आहे.

हार्दिकच्या घड्याळ्याची चर्चा 

हार्दिक पांड्याने त्याच्या घड्याळाचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हार्दिकच्या या घड्याळ्याची फारच चर्चा आहे. हार्दिक पंड्याच्या घड्याळाची किंमत जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. हार्दिक पांड्याच्या या घड्याळाची किंमत 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

घड्याळ खूप खास 

हार्दिक पांड्याचे हे घड्याळ Patek Philippe Nautilus Platinum 5711  ब्रँडचे आहे. हार्दिक पांड्या आणि त्याचा भाऊ कृणाल पंड्या हे मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. त्याची मेहनतच त्याला आज या टप्प्यावर आणली आहे. दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत.

पांड्या ब्रदर्स महागडे घड्याळे आणि गाड्यांचे शौकीन

हार्दिक पांड्या आणि त्याचा भाऊ कृणाल पंड्या महागड्या घड्याळे आणि वाहनांचे शौकीन आहेत. या दोन्ही भावांनी मुंबईत 30 कोटींचा आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. हार्दिक पंड्या आणि त्याचा भाऊ कृणाल पंड्याच्या या फ्लॅटमध्ये 8 बेडरूम आहेत. या भावांचे हे आलिशान घर 3838 स्क्वेअर फूट मध्ये बांधले आहे.