Gentleman's Game ला लावला डाग? हरमनप्रीत कौरविरोधात BCCI करणार बंदीची कारवाई

Harmanpreet Kaur News: भारतीय पुरुष संघामागोमाग आता महिला संघावर बीसीसीआय नाराज. असं नेमकं काय झालं की, थेट संघाच्या कर्णधारावरच करणार कारवाई...   

सायली पाटील | Updated: Jul 25, 2023, 12:09 PM IST
Gentleman's Game ला लावला डाग? हरमनप्रीत कौरविरोधात BCCI करणार बंदीची कारवाई title=
Harmanpreet Kaur likely to be banned for 2 years post bcci action

Harmanpreet Kaur News: क्रिकेट जगतामध्ये काही महत्त्वाचे बदल घडवणाऱ्या आणि त्या बदलांना देश स्तरावर मान्यता देणाऱ्या बीसीसीसीआयनं मागील काही महिन्यांपासून काही कठोर भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारतीय पुरुष संघाचा दारुण पराभव झाल्यानंतर BCCI कडून सुनावलेले खडे बोल कोणीही विसरु शकलेलं नाही. त्यातच आता भारतीय महिला क्रिकेट संघाकडे संस्थेनं रोख वळवला असून, तिथंही अशीच काहीशी परिस्थिती ओढावल्याचं पाहायला मिळत आहे. 

प्राथमिक स्तरावर समोर आलेल्या माहितीनुसार भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी असणाऱ्या Harmanpreet Kaur वर बीसीसीआय कारवाईचा बडगा उगारू शकतं. बांगलादेशविरोधात शनिवारी तिसऱ्या आणि अंतिम एकविदसीय सामन्यानंतर खेळाच्या साहित्याचं नुकसान करणं आणि अंपायची निंदा करणं यासाठी तिच्यावर ही कारवाई केली जाऊ शकते. ज्यामुळं तिच्यावर दोन सामने खेळण्याची बंदी घातली जाण्याची चिन्हं आहेत. 

बीसीसीआयशी संलग्न सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हरमनप्रीतवर खेळाच्या साहित्याचं नुकसान आणि पंचाचा अवमान असे गंभीर आरोप करण्यात आले असून, तिच्या खात्यात नेमके किती डिमेरिट अंक जोडले जावेत यावर विचार केला जात आहे. 

 

हरमनप्रीत इतकं वाईट वागलेली? 

बीसीसीआयनं कठोर पावलं उचलत कारवाई केल्यास हरमनप्रीत आशिया चषकातील सुरुवातीच्या सामन्यांमनध्ये खेळू शकणार नाही. आता तुम्ही म्हणाल असं नेमकं झालं तरी काय? तर, बांगलादेशच्या संघाविरोधात खेळताना हरमनप्रीतला नाहिदा अख्तरच्या चेंडूवर बाद घोषित करण्यात आलं. पण, आपण बाद नसल्याचा सूर तिनं आळवला. इतकंच नव्हे, तर पवेलियनमध्ये परतण्यापूर्वी तिनं भर मैदानाच खेळपट्टीवरील स्टंप बॅटनं उडवून लावत संताप व्यक्त केला. 

हेसुद्धा वाचा : Indian Railway चं तिकीट बुकींग गडबडलं; आताच पाहून घ्या पर्यायी App आणि Website 

दोन्ही संघांना चषक विभागून दिला जाताना पंचांची निंदा करत तिनं त्यांनीही फोटोसेशनचा भाग व्हावं असा उपरोधिक सूर आळलसा होता. या बेशिस्त वर्तणुकीसाठी तिच्यावर ही कारवाई केली जाऊ शकते. आपल्या संघाला मिळालेली वागणूक पाहता बांगलादेशची कर्णधार निगार सुलतानानं एकच फोटो काढत तिथून काढता पाय घेतला. यावेळी तिनं भारतीय महिला संघाच्या कर्णधारपदी असणाऱ्या हरमनप्रीतला शिष्टाचार शिकण्याचा सल्लाही दिला.