मुंबई : महेंद्रसिंह धोनी कॅच पकडण्यात माहीर आहे, जगातील चांगल्या विकेटकिपरमध्ये महेंद्र सिंह धोनीचं नाव घेतलं जातं. युवा क्रिकेटर देखील महेंद्रसिंह धोनीसारखं खेळण्याची इच्छा व्यक्त करतात.
भारतीय अंडर 19 टीमचा विकेटकीपर हार्विक देसाईने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या फायनलमॅचमध्ये एक शानदार कॅच पकडला, आणि फॅन्सचं लक्ष वेधलं. हार्विकने कमलेश नागरकोटीच्या गोलंदाजीवर ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन जयसन संघाला बाद केलं.
हार्विक देसाईने घेतलेल्या या कॅचमुळे सगळीकडूनच त्याचं कौतुक होत असून महेंद्रसिंग धोनीबरोबर त्याची तुलना केली जाते आहे.
बॉल स्टम्पवर आपटून मागच्या बाजूला आला होता त्यावेळी हार्विकने लांब उडी मारत तो कॅच अलगद पकडला. हार्विक देसाईने जबरदस्त कॅच पकडत भारतीया टीमला तिसरी आणि महत्त्वाची विकेट मिळवून देण्याचं काम केलं.
अनुकून रॉय फेकत असलेल्या ओव्हरच्या पाचव्या बॉलवर साद खान क्रीजपेक्षा पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न करत होता. पण हार्विकने त्याला यशस्वी होऊ दिलं नाही.
याआधी हार्विक देसाईने सेमीफायनल मॅचमध्ये पाकिस्तानच्या विरोधात एक स्टंपिंग केली होती. त्याने पाकिस्तानी खेळाडू साद खानला शानदारपद्धतीने स्टंपिंग करत महेंद्रसिंग धोनीची आठवण करून दिली होती.