हसीन जहांचे 'न्यूड' फोटो, मोहम्मद शमीकरता लिहिला मॅसेज

शमीचे चाहते भडकले 

Updated: May 31, 2020, 02:59 PM IST
हसीन जहांचे 'न्यूड' फोटो, मोहम्मद शमीकरता लिहिला मॅसेज

मुंबई : भारतीय क्रिकेटर मोहम्मद शमीच्या पत्नीने हसीन जहांने इंस्टाग्रामवर एक न्यूड फोटो शेअर केला आहे. या फोटोमुळे सगळेच हैराण झाले आहेत. या फोटोत तिच्या सोबत मोहम्मद शमी असल्याचा दावा तिने केला आहे. या फोटोवरून शमीवर त्याचे चाहते भडकले आहेत. या फोटोवर खूप लोकांनी कमेंट केले आहेत. 

हसीनने या फोटोसोबत शमीला एक मॅसेज देखील लिहिला आहे. तिने लिहिलं आहे की,'कल तू कुछ नही था तो मै पाक थी, आज तू कुछ बन गया तो मैं नापाक हो गई. झूठ बुर्खा डालकर बेपर्टा सच को मिटा नहीं सकता. मगरमच्छ के आंसू कुछ दिनों का ही सहारा होते है. यासोबत तिने लिहिलं आहे की, क्रिकेटर शमी अहमदसोबत.' 

महत्वाची बाब म्हणजे शमी आणि हसीन गेल्या काही वर्षांपासून वेगळे राहत आहेत. हसीन जहां आणि मोहम्मद शमीमध्ये वाद सुरू आहेत. हसीन जहांने शमीवर अनेक आरोप केले असून आता हे दोघे वेगळे राहत आहेत. या दोघांना एक मुलगी देखील आहे. 

या अगोदर तिने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ देखील शेअर केला होता. या व्हिडिओची देखील जोरदार चर्चा रंगली होती.