स्टीव्ह स्मिथऐवजी राजस्थान रॉयल्सकडून हा खेळाडू मैदानात उतरणार

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि कॅमरून बँक्रॉफ्ट यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे.

Updated: Apr 2, 2018, 05:19 PM IST
स्टीव्ह स्मिथऐवजी राजस्थान रॉयल्सकडून हा खेळाडू मैदानात उतरणार title=

जयपूर : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि कॅमरून बँक्रॉफ्ट यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे. स्मिथ-वॉर्नरचं एका वर्षासाठी तर कॅमरून बँक्रॉफ्टचं ९ महिन्यांसाठी निलंबन करण्या आलंय. या कारवाईमुळे स्मिथ-वॉर्नर आयपीएललाही मुकणार आहे.

स्मिथऐवजी क्लासेन राजस्थानच्या टीममध्ये

स्मिथवर बंदी आल्यानंतर राजस्थान रॉयल्सनं दक्षिण आफ्रिकेच्या हेनरिक क्लासेनला टीममध्ये घेतलं आहे. नुकत्याच भारताविरुद्ध झालेल्या वनडे सीरिजमधून क्लासेननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. दुसऱ्या वनडेमध्येच क्लासेनला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. वनडेनंतर झालेल्या टी-20 सीरिजमध्येही क्लासेन खेळला होता.

अजिंक्य रहाणे राजस्थानचा कॅप्टन

आयपीएलच्या लिलावानंतर राजस्थान रॉयल्सनं स्टीव्ह स्मिथकडेच टीमचं नेतृत्व दिलं होतं. पण आता स्टीव्ह स्मिथ खेळणार नसल्यामुळे अजिंक्य रहाणेकडे राजस्थानचं नेतृत्व देण्यात आलं आहे.

वॉर्नरऐवजी ऍलेक्स हेल्स

तर सनरायजर्स हैदराबादच्या टीममध्ये डेव्हिड वॉर्नरऐवजी इंग्लंडच्या ऍलेक्स हेल्सची निवड करण्यात आली आहे. २०१५ साली हेल्स मुंबई इंडियन्सकडे होता पण त्याला एकाही मॅचमध्ये संधी देण्यात आली नाही. हेल्स हा आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये शतक करणारा इंग्लंडचा एकमेव खेळाडू आहे.

केन विलियमसन हैदराबादचा कॅप्टन

डेव्हिड वॉर्नरलाही आयपीएल खेळता येणार नसल्यामुळे सनरायजर्स हैदराबादलाही त्यांचा कॅप्टन बदलावा लागला आहे. वॉर्नरऐवजी न्यूझीलंडच्या केन विलियमसनकडे हैदराबादच्या कर्णधारपदाची धुरा देण्यात आली आहे.