IND vs AUS Probable Playing 11: टी-20 वर्ल्डकपच्या सुपर 8 मध्ये भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना रंगणार आहे. भारताचा सुपर 8 मधील हा तिसरा आणि शेवटचा सामना डॅरेम सॅमी क्रिकेट ग्राऊंडवर खेळवण्यात येणार आहे. दरम्यान सेमीफायनल गाठण्यासाठी दोन्ही टीम्ससाठी हा महत्त्वाचा सामना असणार आहे. यावेळी जर कांगारूंनी भारताचा पराभव केला तर ते 6 अंकांसह थेट सेमीफायनल गाठू शकणार आहेत. मात्र भारताला देखील कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकायचा आहे. जाणून घेऊया या सामन्यात टीम इंडियाची प्लेईंग 11 कशी असणार आहे.
वर्ल्डकप सुरु झाल्यापासून रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी ओपनिंग केली आहे. यावेळी दोन्ही वरिष्ठ खेळाडूंनी अनेक सामन्यांमध्ये चांगली सुरुवात केली आहे. मात्र त्यांना मोठी खेळी साकारता आली नाही. रोहितने आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 52 रन्सची खेळ केली होती. तर कोहलीने बांगलादेशविरुद्ध 37 रन्स केल्या होत्या. त्यामुळे आजच्या सामन्यात देखील या दोन फलंदाजांची जोडी पुन्हा एकदा मैदानावर ओपनिंग करताना दिसू शकते. ऋषभ पंत तिसऱ्या क्रमांकावर उतरू शकतो. विकेटकीपर फलंदाज म्हणून पंतचा टीममध्ये समावेश होणार आहे.
पुन्हा एकदा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवला चौथ्या क्रमांकावर संधी मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय सूर्या उत्कृष्ट फॉर्ममध्येही आहे. सूर्याकडे मैदानाच्या कोणत्याही कोपऱ्यात फटके मारून सामना पालटण्याची क्षमता आहे. यानंतर पुन्हा एकदा पाचव्या क्रमांकावर शिवम दुबेला संधी मिळण्याची शक्यता आहे. दुबेने बांगलादेशविरुद्ध चांगली फलंदाजी केली. यानंतर सहाव्या क्रमांकावर हार्दिक पंड्या खेळण्यास उतरणार आहे.
जसप्रीत बुमराह वेगवान गोलंदाजीची जबाबदारी पार पाडणार आहे. त्याच्यासोबत अर्शदीप सिंगला साथ देण्याची संधी मिळू शकते. कुलदीप यादव, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल हे स्पिनची जबाबदारी सांभाळू शकतात. त्यामुळे या तिघांचाही समावेश प्लेईंग 11 मध्ये होणार आहे. आजच्या सामन्यात मोहम्मद सिराजला संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह आणि जसप्रीत बुमराह