Ram Rahim T 20 Cricket : टी-10 आणि टी-20 क्रिकेटची सुरुवात मी केली होती, बाबा राम रहीमचा दावा

राम रहीम (Ram Rahim) जेलमधून 40 दिवसांसाठी पेरॉलवर बाहेर आला आहे. जेलमधून बाहेर असल्याने तो सत्संग करतोय.

Updated: Nov 21, 2022, 10:14 PM IST
Ram Rahim T 20 Cricket : टी-10 आणि टी-20 क्रिकेटची सुरुवात मी केली होती, बाबा राम रहीमचा दावा title=

मुंबई : सध्या टी 20 क्रिकेटची (T 20 Cricket) चलती आहे. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात टी 20 सीरिजचं आयोजन केलं जातं. कमी वेळ, थरार आणि मजा या त्रिसुत्रीमुळे टी 20 फॉरमेट क्रिकेट चाहत्यांच्या पसंतीस उतरलाय. टीम इंडियाने पहिला टी 20 वर्ल्ड कप जिंकण्यापासून ते आतापर्यंत टी 20 क्रिकेटची क्रेझ दिवसेंदिवस वाढतेय. दरम्यान डेरा सच्चा सौदा प्रमुख स्वयंघोषित धर्मगुरु गुरमीत राम रहीम सिंहने (gurmeet ram rahim) अजब दावा केलाय. (i started t 10 and t20 cricket before 24 years says gurmeet ram rahim video viral on social media)

राम रहीम काय म्हणाला?  

"मी 24 वर्षांपूर्वी हरियाणातील सिरसा जिल्ह्यामध्ये जलालआना गावात टी 10 आणि टी 20 क्रिकेटची सुरुवात केली होती. तेव्हा दिग्गज क्रिकेटर म्हणायचे की हे काय क्रिकेट आहे का? तेव्हा या प्रकाराला कुणी गांभिर्याने घेतलं नाही. कुणीच टी 20 क्रिकेट खेळण्यात उत्सूक नव्हता. मात्र आज टी 20 क्रिकेटला संपूर्ण जगाने स्वीकारलंय", असा दावा राम रहिमने ऑनलाईन सत्संगदरम्यान केलाय. 

"गावात आयोजित केलेल्या सामन्यांमध्ये मी सिक्सप्रमाणे अठ्ठाही (8 धावा) ठेवला होता. आता तो दिवस दूर नाही जेव्हा अठ्ठा छक्क्यावर वरचढ ठरेल", असंही राम रहिमने नमूद केलं. 

राम रहिम जेलमधून 40 दिवसांसाठी पेरॉलवर बाहेर आला आहे. जेलमधून बाहेर असल्याने तो सत्संग करतोय. कारागृहातून पेरॉलवर सुटल्यानंतर त्याने 2 गाणी  रिलीज केली. दरम्यान राम रहिमचा 40 दिवसांचा पेरॉल  25 नोव्हेंबरला संपतोय.