T 20 World Cup 2021 विजेता संघ मालामाल होणार, जाणून घ्या कोणाला किती रक्कम मिळणार

टी 20 वर्ल्ड कपची 2021 ( T 20 World Cup 2021) सुरुवात 17 ऑक्टोबरपासून होत आहे.  

Updated: Oct 10, 2021, 10:48 PM IST
T 20 World Cup 2021 विजेता संघ मालामाल होणार, जाणून घ्या कोणाला किती रक्कम मिळणार

दूबई : टी 20 वर्ल्ड कप 2021 स्पर्धेची क्रिकेट चाहते उत्सूकतेने वाट पाहतायेत. या क्रिकेटच्या 'रन'संग्रामाला अवघे काही दिवस उरले आहेत. टी 20 वर्ल्ड कपची 2021 ( T 20 World Cup 2021) सुरुवात 17 ऑक्टोबरपासून होत आहे. स्पर्धेचं आयोजन यूएई आणि ओमानमध्ये करण्यात आलं आहे. दरम्यान आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) विजेत्या, उपविजेत्या संघासह इतर सहभागी संघांना बक्षिस म्हणून किती रक्कम मिळणार याची घोषणा केली आहे. आयसीसीने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. (icc announced Prize money for T20 World Cup  2021 winners runner up and drink break time)
 
विजेता-उपविजेता संघ मालामाल

आयसीसी वर्ल्ड कप विजेत्या संघाला बक्षिस म्हणून 1.6 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 12 कोटी रुपये रक्कम बक्षिस म्हणून देणार आहे. तर उपविजेत्या म्हणजेच अंतिम सामन्यात पराभूत होणाऱ्या टीमला 8 लाख डॉलर म्हणजेच जवळपास (6 कोटी) रुपये मिळणार आहेत. 

ड्रिंक्स ब्रेक किती मिनिटं असणार? 

आयसीसीने बक्षिसाच्या रक्कमेसह ड्रिंक्स ब्रेक किती मिनिटं असणार, याबाबतती माहिती दिली आहे. आयसीसीनुसार, अडीच मिनिटं ड्रिंक ब्रेक (Drink Break) असणार आहे. तसेच सुपर 12 (Super 12) फेरीनंतर प्रत्येक संघाला विजयानंतर बक्षिस म्हणून बोनस अवॉर्ड देण्यात येणार आहे.

टी 20 वर्ल्ड कप 2016 मध्येही अशाच प्रकारे बोनस देण्यात येणार आहे. सुपर 12 फेरीत एकूण 30 सामने होणार आहेत. या 30 सामन्यांसाठी एकूण 40 हजार डॉलर जवळपास (1 कोटी 20 लाख) इतकी रक्कम ही बक्षिस म्हणून देण्यात येणार आहे.

सेमी फायनलमध्ये पराभूत संघाला किती मिळणार? 

या स्पर्धेत सेमी फायनलमध्ये पराभूत होणाऱ्या दोन्ही संघांना 4 लाख अमेरिकी डॉलर (3 कोटी) रुपये मिळतील. या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी बक्षिस म्हणून एकूण 5.6 मिलियन डॉलर म्हणजेच 42 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. 

या स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी होणार आहेत. 70 हजार डॉलर्स (52 लाख रुपये) सुपर 12 स्टेजवर संपलेल्या प्रत्येक संघाला दिले जातील. फेरी लीगच्या 12 सामन्यांच्या दरम्यान, प्रत्येक सामन्यासाठी 40 हजार डॉलर्स दिले जातील. फेरी -1 मधून बाहेर पडलेल्या चार संघांना 40-40 हजार डॉलर्स (सुमारे 30 लाख रुपये) मिळतील.
 
सुपर 12 राऊंडमधून आव्हान संपुष्टात आलेल्या प्रत्येक संघाला 70 हजार डॉलर म्हणजेच 52 लाख रुपये दिले जातील. तर साखळी फेरीत 12 सामने होतील. या प्रत्येक सामन्यासाठी 40 हजार डॉलर (30 लाख) देण्यात येणार आहेत. तर राऊंड 1 मधून  बाहेर पडणाऱ्या 4 संघांना प्रत्येकी 30 लाख रुपये देण्यात येतील.   

राऊंड 1मध्ये कोणते संघ?

बांगलादेश, आयर्लंड, नामिबिया, नेदरलँड, पापुआ न्यू गिनी, ओमान, स्कॉटलंड आणि श्रीलंका या संघांचा राऊंड 1 मध्ये समावेश आहे. तर अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि वेस्टइंडीजचा सुपर 12 मध्ये समावेश आहे.

वर्ल्ड कपसाठी गृपनिहाय संघ

राऊंड 1 –

ग्रुप ए- श्रीलंका, आयर्लंड, नेदरलँड, नामीबिया

ग्रुप बी- बांगलादेश, स्कॉटलँड, पापुआ न्यू गुएना (पीएनजी), ओमान

सुपर 12

ग्रुप 1- इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रीका, वेस्टइंडीज, ए1 आणि बी2

ग्रुप 2- भारत, पाकिस्तान, न्यूजीलंड, अफगानिस्तान, ए2 आणि बी1 

टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : विराट कोहली(कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, राहुल चाहर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी.

राखीव खेळाडू :  श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर आणि दीपक चाहर