ICC कडून केलेल्या चुकीच्या ट्विटवर रोहित शर्मा एक्शन घेणार?

इंटरनॅशनल क्रिकेट काऊंसिलने एक ट्विट केलं आहे, जे प्रचंड व्हायरल होताना दिसतंय. 

Updated: Apr 29, 2022, 11:24 AM IST
ICC कडून केलेल्या चुकीच्या ट्विटवर रोहित शर्मा एक्शन घेणार? title=

मुंबई : उद्या म्हणजेच 30 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा त्याचा 35 वा वाढदिवस साजरा करणार आहे. रोहितला आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार मानलं जातं. यासाठीच त्याचे चाहते उद्याच्या दिवसाची वाट पाहत आहेत. याचदरम्यान इंटरनॅशनल क्रिकेट काऊंसिलने एक ट्विट केलं आहे, जे प्रचंड व्हायरल होताना दिसतंय. 

आईसीसीकडून रोहितबाबत चुकीचं ट्विट

दरवर्षी रोहित शर्मा 30 एप्रिल रोजी त्याचा वाढदिवस साजरा करतो. मात्र आयसीसीने 29 एप्रिल म्हणजेच आजच रोहितला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाचा ट्विट केलं. 

आयसीसीने रोहितला वाढदिवासाच्या शुभेच्था देणाऱ्या ट्विटमध्ये लिहिलं की, भारतीय टीमचा कर्णधाराला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. या ट्विटसोबतच आयसीसीने रोहितच्या शतकाचा व्हिडीयोही पोस्ट केला आहे. 2019 साली रोहितने पाकिस्तानविरूद्ध हे शतक झळकावलं होतं. 

चाहत्यांनी केलं ट्रोल

आयसीसीने हे ट्विट केल्यानंतर काही वेळातच क्रिकेट चाहत्यांनीही ट्विटरवर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. या ट्विटवर काही क्रिकेट चाहते आयसीसीची खिल्ली उडवत होते. तर एका यूजरने आयसीसीला ट्रोल करत 'भाई, तुम्ही कोणते नशा करत आहात?' असं म्हटलंय. याशिवाय ट्विटवर चाहत्यांकडून इतरही अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत.