कोलकाता : २०१९ सालच्या क्रिकेट वर्ल्ड कपचं वेळापत्रक आयसीसीनं निश्चित केलं आहे. आता हे वेळापत्रक गुरुवारी आयसीसी बोर्डाच्या अंतीम मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. २०१९ वर्ल्ड कप ३० मे ते १५ जुलैपर्यंत खेळवण्यात येणार आहे. क्रिक इन्फो या वेबसाईटनं आयसीसीच्या या वेळापत्रकाची बातमी प्रसिद्ध केली आहे. ३० मे रोजी इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका या मॅचनं २०१९ वर्ल्ड कपला सुरुवात होईल. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान या १० देशांमध्ये २०१९ चा वर्ल्ड कप होईल. तसंच १९९२ साली खेळवण्यात आलेल्या वर्ल्ड कपनुसार प्रत्येक टीम एकमेकांविरोधात एक सामना खेळेल. यानंतरच्या टॉप ४ टीम सेमी फायनलमध्ये एकमेकांना भिडतील. ५ जूनला भारत त्यांचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळेल.
५ जून- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका- साऊथॅम्पटन
९ जून- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया- ओव्हल
१३ जून- भारत विरुद्ध न्यूझीलंड- नॉटिंगहॅम
१६ जून- भारत विरुद्ध पाकिस्तान- मॅन्चेस्टर
२२ जून- भारत विरुद्ध अफगाणिस्तान- साऊथॅम्पटन
२७ जून- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज- मॅन्चेस्टर
३० जून- भारत विरुद्ध इंग्लंड- बर्मिंगहॅम
२ जुलै- भारत विरुद्ध बांग्लादेश- बर्मिंगहॅम
६ जुलै- भारत विरुद्ध श्रीलंका- लीड्स
९ जुलै- पहिली सेमी फायनल
१० जुलै- राखीव दिवस
११ जुलै- दुसरी सेमी फायनल
१२ जुलै- राखीव दिवस
१४ जुलै- फायनल
१५ जुलै- राखीव दिवस