Stop Clock Rule for bowlers : वनडे वर्ल्ड कपची सांगता झाल्यानंतर आता इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलने (ICC) मंगळवारी वनडे क्रिकेट आणि टी-ट्वेंटी फॉरमॅटसाठी नवीन नियम जाहीर केले आहेत. या नियमांमध्ये एका नव्या नियमाचा समावेश करण्यात आला आहे. स्टॉप क्लॉक असं या नियमाला नाव देण्यात आलं आहे. आयसीसीच्या सामन्यात पुरुष गटात एकदिवसीय आणि टी-20 फॉरमॅटमध्ये चाचणी आधारावर याची अंमलबजावणी केली जाईल. त्यानंतरच हा नियम सर्वत्र लागू करण्यात येईल, असं आयसीसीकडून जाहीर करण्यात आलं आहे.
गोलंदाजी करणाऱ्या संघाला षटकांच्या सुरुवातीमध्ये फक्त 60 सेकंद म्हणजेच एक मिनिट लागू शकतो. 60 सेकंदांची वेळ मर्यादा तीनदा ओलांडल्यास, फलंदाजी करणाऱ्या संघाला 5 पेनल्टी धावा लागू केल्या जातील, असा आयसीसीचा नवा स्टॉप क्लॉक (Stop Clock) नियम आहे.
आयसीसीच्या हा नवा नियम ट्रायल आधारावर सामील करण्यात आलाआहे. याची चाचणी डिसेंबर 2023 पासून सुरू होईल, जी एप्रिल 2024 पर्यंत चालणार आहे. बैठकीनंतर बोर्डाने वनडे आणि टी-20 क्रिकेटमध्ये नवीन नियम लागू करण्यास सहमती दर्शवली आहे. प्रत्येक संघाला मागील षटक संपल्यानंतर 60 सेकंदात पुढील षटक सुरू करावे लागतील, असं आयसीसीने (ICC) एका निवेदनात म्हटलं आहे.
आयसीसीने यापूर्वी 2022 मध्ये, दंडाव्यतिरिक्त, आयसीसीने निर्धारित वेळेत ओव्हर टाकले नाही तर अतिरिक्त फिल्डरला 30 यार्डच्या वर्तुळात जाण्याची परवानगी देण्याचा नियम देखील लागू केला होता. याचा परिणाम वर्ल्ड कप स्पर्धेत देखील झाल्याचं पहायला मिळालं.
ICC Board announce new hosts for Men's U19 Cricket World Cup 2024
More
— ICC (@ICC) November 21, 2023
आयसीसी नियम ४०.१.१ नुसार, फलंदाज बाद झाल्यानंतर किंवा निवृत्त झाल्यानंतर पुढील २ मिनिटांत पुढील फलंदाजाने त्याचा पहिला चेंडू खेळण्यासाठी तयार असणे आवश्यक आहे. शाकिब अल हसन याने जेव्हा श्रीलंकेच्या मॅथ्यूजची टाईम आऊटने विकेट घेतली. तेव्हापासून टाईम आऊट नियम चर्चेत आहे.