ऑनलाईन फ्रॉडर्सनी ICC लाही सोडलं नाही, अवघ्या काही मिनिटांमध्ये लागला कोटींचा चुना

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद एका ऑनलाईन फ्रॉडची बळी ठरली आहे. एका व्यक्तीने आयसीसीला कोटी रूपयांचा चुना लावला आहे. दरम्यान या फसवणूकीची चौकशी करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. 

Updated: Jan 20, 2023, 05:11 PM IST
ऑनलाईन फ्रॉडर्सनी ICC लाही सोडलं नाही, अवघ्या काही मिनिटांमध्ये लागला कोटींचा चुना title=

ICC Online Fraud: ICC म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊंसिल (ICC) सोबत मोठी फसवणूक (Online Fraud) झाल्याचं समोर आलं आहे. सध्या जगभरात ऑनलाईन फ्रॉडची प्रकरणं वाढत असताना आयसीसी देखील याा शिकार झाली आहे. यामध्ये एका व्यक्तीने आयसीसीला कोटी रूपयांचा चुना लावला आहे. दरम्यान या फसवणूकीची चौकशी करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. 

आयसीसीची तब्बल 21 कोटींची फसवणूक

क्रिकबजच्या एका रिपोर्टनुसार, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद एका ऑनलाईन फ्रॉडची बळी ठरली आहे. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेतील एका व्यक्तीने ICC साठी सल्लागार म्हणून बोगस ईमेल आयडी तयार केला असल्याची माहिती आहे. यावेळी त्याने फेडरेशनच्या सीएफओकडे व्हाउचरची मागणी केली. या माध्यमातून त्याने आयसीसीची 21 कोटींची फसवणूक केली आहे.

आयसीसीची कशी झाली फसवणूक?

अमेरिकेतील या व्यक्तीने बनवलेल्या बोगस ईमेल आयडीच्या माध्यमातून 20 कोटींपेक्षा अधिकची बिलं ICC चे मुख्य वित्त अधिकारी म्हणजेच CFO यांना पाठवून दिली तसंच या बिलांचे पैसे भरण्यास सांगितले. CFO च्या कार्यालयानी ही बिलं भरली आणि त्यांची फसवणूक झाली. 

मात्र या ठिकाणी एक प्रश्न असा उपस्थित होतो की, सीएफओ कार्यालयातील कोणत्याच व्यक्तीने बँक खात्याच्या क्रमांकाकडे कोणी का लक्ष दिलं नाही. दरम्यान आयसीसी सध्या याबाबत काहीही अधिकृतरित्या माहिती दिली नसून याचा तपास सुरू केला आहे. शिवाय यासाठी एमेरिकेतील कायदेशीर एजन्सीकडेही तक्रार करण्यात आली आहे.

मिडीया रिपोर्ट्सनुसार, International Cricket Council सोबत पहिल्यांदाच अशी फसवणूकीची घटना घडलेली नाही. यापूर्वीही 3-4 वेळा आयसीसीला फसवणूकीच्या गोष्टींचा सामना करावा लागला होता.