मुंबई: भारत विरुद्ध इंग्लंड 4 कसोटी सामन्यांची मालिका नुकतीच संपली आहे. या मालिकेत टीम इंडियानं 3-1नं दणदणीत विजय मिळवला आहे. या सीरिजनंतर WTCच्या अंतिम सान्याचं तिकीट पक्क झालं आहे. तर त्यासोबत अनेक खेळाडूंचं ICC टेस्ट रँकिंगमध्ये स्थान वाढलं आहे. तर दोन ठिकाणी टीम इंडियाच्या पदरी निराशा देखील पडली आहे.
ऋषभ पंतनं अहमदाबाद कसोटी सामन्यात 101 धावांची विक्रमी खेळी केली होती. आता आयसीसी टेस्ट रँकिंगच्या विचार करता रोहित शर्मा हेनरी निकोल्स सातव्या स्थानावर आहेत. चेन्नईतील कसोटी सामन्याचा रोहित शर्माला फायदा झाला आहे.
WTCच्या अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी वॉशिंग्टन सुंदरचा देखील वाटा फार मोलाचा आहे. या क्रमवारीत सुंदर आता 62 व्या स्थानावर पोहोचला आहे. तर चेतेश्वर पुजाराला खास प्रदर्शन करता आलं नाही. त्यामुळे पुजाराचं क्रमवारीतलं 13वं स्थान डळमळीत झालं आहे.
अश्विन आणि अक्षर पटेलला मोठा फायदा
इंग्लंडच्या फलंदाजांमध्ये दहशत निर्माण करणारा टीम इंडियाचा स्पिनर गोलंदाज रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल यांनी गोलंदाजांच्या क्रमवारीत चांगली सुधारणा केली. इंग्लंडविरुद्ध सामनावीर म्हणून निवडलेला अश्विन आता न्यूझीलंडच्या नील वॅग्नरला मागे टाकलं आहे. अक्षर पटेल 30व्या क्रमांकावर पोहोचला आहे.
गोलंदाजांच्या क्रमवारीत रशीद खानने पहिले स्थान कायम राखले आहे. न्यूझीलंडविरुद्ध टी -२० मालिकेत उत्कृष्ट कामगिरी करणारा आगर गोलंदाजांच्या क्रमवारीत चौथ्या स्थानी आहे. पहिल्या 10 गोलंदाजांमध्ये कोणत्याही भारतीय खेळाडूचा समावेश नाही.
अफगाणिस्तानचाअष्टपैलू मोहम्मद नबी अष्टपैलू क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे. शकीब अल हसन दुसर्या स्थानावर तर ग्लेन मॅक्सवेल तिसर्या स्थानी आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत पहिल्या 10 खेळाडूंमध्ये टीम इंडियाचा कोणताही खेळाडूचा समावेश नसल्यानं निराशेची बाब मानली जात आहे.