#DhoniKeepTheGlove ट्विटरवर ट्रेंड, नेटकऱ्यांचा ICC वर संताप

नेटकऱ्यांचा धोनीला मोठा पाठिंबा

Updated: Jun 7, 2019, 02:42 PM IST
#DhoniKeepTheGlove ट्विटरवर ट्रेंड, नेटकऱ्यांचा ICC वर संताप title=

मुंबई : महेंद्रसिंह धोनीच्या ग्लोजवरून पेटलेल्या वादाचे पडसाद समाज माध्यमांवरही जोरदार पणे उमटतांना दिसत आहे.  #DhoniKeepTheGlove अशा हॅशटॅगने नेटकऱ्यांनी देखील धोनीला पाठिंबा दिला आहे. बीसीसीआयनेही धोनीच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचा निर्णय़ घेतला आहे. 

रितेश देशमुखसह बॉलिवुडमधील अनेक कलावंतांनी धोनीची बाजू घेतली आहे. धोनीनं ग्लोव्जवर लावलेल्या मानचिन्हात काहीही चुकीचं नसल्याचं म्हटलं आहे. धोनीनं पॅरा कमांडोजच्या पॅराशूट युनिटचे मानचिन्ह असेलेले ग्लोज वापरल्याने टीका होत होती.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या मॅचमध्ये टीम इंडियाने विजयी सलामी दिली. या मॅचमध्ये धोनीच्या ग्लोजची चांगलीच चर्चा रंगली. परंतु हा ग्लोज धोनीने घालू नये असे आदेश आयसीसीने धोनीला दिले. यावरुन चांगलाच वाद निर्माण झाला. नेटकऱ्यांनी आयसीसीला चांगलेच धारेवर धरलं आहे. तसेच ट्रोल देखील केले आहे. धोनीने पुढील मॅचमध्ये देखील तेच ग्लोज घालावेत असे नेटकऱ्यांनी म्हटंल आहे.

Praise of Dhoni

टीम इंडिया वर्ल्डकपमध्ये आपली पहिली मॅच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळली. या मॅचमध्ये धोनीने पॅरा कमांडोजच्या पॅराशूटचे टॅग असलेले ग्लोज वापरले होते. धोनीच्या समर्थनार्थ नेटकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. #DhoniKeepTheGlove हा हॅशटॅग ट्विटरवर मोठ्या प्रमाणात ट्रेंड होतो आहे.