न्यझीलंडच्या मैदानावर स्मृति-हरमन नावाचं तुफान; वेस्ट इंडिज महिला गोलंदाजांची नाचक्की

भारताकडून स्मृती मंधाना आणि हरमनप्रीत कौरने उत्तम खेळी करून शतक झळकावलं आहे.

Updated: Mar 12, 2022, 10:32 AM IST
न्यझीलंडच्या मैदानावर स्मृति-हरमन नावाचं तुफान; वेस्ट इंडिज महिला गोलंदाजांची नाचक्की title=

न्यूझीलंड : आयसीसीच्या महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारत विरूद्ध वेस्ट इंडिज असा सामना रंगला आहे. यामध्ये वेस्ट इंडिजला 318 रन्सचं लक्ष्य देण्यात आलं आहे. यावेळी भारताच्या नारींनी आज आज उत्तम फलंदाजी करत वेस्ट इंडिजला मोठं लक्ष्य दिलं आहे. त्यामुळे हे लक्ष्य वेस्ट इंडिजची महिला टीम कसं पार करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मंधाना आणि कौरचं शतक

भारताकडून स्मृती मंधाना आणि हरमनप्रीत कौरने उत्तम खेळी करून शतक झळकावलं आहे. मंधानाने 119 बॉलमध्ये 123 रन्स केले. यामध्ये 13 चौकार आणि 2 सिक्सचा समावेश आहे. तर हरमनप्रीत कौरने 107 बॉल्समध्ये 109 रन्सची खेळी केली आहे.

भारतीय कर्णधार मिताली राजने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात देखील भारतीय ओपनर शेफाली वर्माचा समावेश करण्यात आला नव्हता. मात्र स्मृती मंधाना आणि यास्तिका भाटिया यांच्या जोडीने चांगली सुरुवात करून दिली. या दोघींमध्येही 49 रन्सची पार्टनरशीप झाली. 
 
दरम्यान मिताली राज वर्ल्डकपमध्ये कर्णधार म्हणून सर्वात जास्त 24 सामने खेळाणारी जगातील पहिली खेळाडू बनली आहे. यामध्ये तिने ऑस्ट्रेलियाची माजी कर्णधार बेलिंडा क्लार्कचा रेकॉर्ड मोडला आहे. बेलिंडाने कर्णधार म्हणून वर्ल्डकपचे 23 सामने खेळले आहेत.