न्यूझीलंड : महिलांच्या वर्ल्डकपमधून निराशाजनक बातमी समोर आली आहे. टीम इंडिया आयसीसीच्या वर्ल्डकपमधून बाहेर पडली आहे. दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा 3 विकेट्सने पराभव केला आहे. तर टीम इंडियाचा पराभव झाल्याने वेस्ट इंडिज सेमीफायनलमध्ये पोहोचली आहे.
भारतीय कर्णधार मिताली राजने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. टीम इंडिलाया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वर्ल्डकपच्या करो किंवा मरोच्या सामन्यात भारताला 7 बाद 274 रन्स करता आले.
शेवटच्या 2 बॉल्समध्ये दक्षिण आफ्रिकेला 3 रन्स हवे होते. मात्र यावेळी दीप्ती शर्माने नो बॉल फेकला आणि दक्षिण आफ्रिकेचा विजय जवळपास निश्चित झाला. अखेरच्या 2 बॉल्समध्ये विरोधी टीमने 2 रन्स काढून भारताचा पराभव केला.
दक्षिण आफ्रिकेकडून लॉरा वोल्वार्टने 80 रन्स केले. याशिवाय लारा डूडलने 49 रन्स केले. मिनोआन डू प्रेझने उत्तम खेळी करत 50 रन्स केले. दुसरीकडे भारताकडून राजेश्वरी गायकवाडने सर्वाधिक 2 विकेट्स घेतले. त्याने 10 षटकात 61 धावा दिल्या. हरमनप्रीत कौरने 8 ओव्हर्समध्ये 2 विकेट्स घेतले.
टीम इंडिया बाहेर पडल्याने महिला वर्ल्डकपच्या उपांत्य फेरी कोणत्या टीममध्ये खेळली जाईल हे निश्चित झालंय. यामध्ये आता ऑस्ट्रेलियाचा सामना वेस्ट इंडिजशी होणार आहे, तर दक्षिण आफ्रिकेचा सामना इंग्लंडशी होणार आहे.