IND vs PAK Playing 11: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियात कोणाला संधी? अशी असेल Playing XI

IND vs PAK, World Cup 2023: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान हा हायव्होल्टेज सामना येत्या शनिवारी म्हणजे 14 ऑक्टोबरला खेळवण्यात येणार आहे. या महत्वाच्या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

राजीव कासले | Updated: Oct 12, 2023, 08:31 PM IST
IND vs PAK Playing 11: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियात कोणाला संधी? अशी असेल Playing XI title=

India vs Pakistan: एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील सर्वात हायव्होल्टेज सामना म्हणजे भारत-पाकिस्तान दरम्यानचा सामना. 14 ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) खेळवण्यात येणाऱ्या या सामन्याकडे करोडो क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे. दोन्ही सामने प्रत्येकी दोन सामने जिंकले आहेत. त्यामुळे तिसरा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ मैदानात तगडी प्लेईंग इलेव्हन (Playing XI) उतरवणार हे निश्चित. त्यामुळे टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी देणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. शुभमन गिल (Shubman Gill) डेंग्यूच्या आजारातून सावरत असल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे. शुभमन गिल सरावासाठीही उतरल्याने पाकिस्तानविरुद्धचा सामना तो खेळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

गिल इन-ईशान किशन आऊट
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल पूर्णपणे फिट झाला तर त्याचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश होणार हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळ ईशान किशनला बाहेर बसावं लागू शकतं. इशान किशन ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात शुन्यावर बाद झाला तर अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्याला 47 धावा करता आल्या. याशिवाय केएल राहुल, श्रेयस अय्यर  यांची जागा पक्की आहे. 

गोलंदाजीत कोणाला संधी?
फलंदाजीत एक बदल वगळता फारसा बदल होणार नाही. पण गोलंदाजीत कोणाला संधी मिळणार याची क्रिकेटप्रेमींना उत्सुकता आहे. दुसऱ्या सामन्यात आर अश्विनच्या जागी शार्दुल ठाकूरला संघात संधी देण्यात आली होती. आता तिसऱ्या सामन्यात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला संधी मिळू शकते असा दावा तज्ज्ञांनी केलाय.

मोहम्मद शमीला संधी?
मोहम्मद शमी पाकिस्तानविरुद्ध आतापर्यंत तीन एकदिवसीय सामने खेळला आहे. यात त्याने 107 धावा देत 5 विकेट घेतल्या आहेत. 35 धावांवर 4 विकेट ही शमीची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. त्यातच अहमदाबादचं नरेंद्र मोदी स्टेडिअम हे त्याचं होमपिच आहे. आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सकडून खेळताना याच मैदानावर शमी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला होता. आयपीएलमध्ये 28 विकेट घेत तो पर्पल कॅपचा मानकरीही ठरला होता. अहमदाबादच्या खेळपट्टीचा त्याला पूर्ण अंदाज आहे, त्यामुळे पाकिस्तानविरुद्ध प्लेईंग इलेव्हनसाठी तो मजबूत दावेदार आहे. 

आर अश्विनची शक्यता किती?
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमची बाऊंड्री लाईन लांब आहे. त्यामुळे आर अश्विनला खेळण्यात पाकिस्तानी फलंदाजांना अडचण येऊ शकते. अश्विन अनुभवी गोलंदाज आहे. पाकिस्तानविरुद्ध खेळण्याचा त्याला इतर दोघांपेक्षा जास्त अनुभव आहे. आठव्या क्रमांकावर त्याची फलंदाजीसाठी मदत होऊ शकते. 

शार्दुल ठाकूर विकेटटेकर
शार्दुल ठाकूर हा विकेटटेकर गोलंदाज म्हणून ओळखला जातो. मधल्या षटकात खेळपट्टीवर जम बसलेली जोडी फोडण्यात त्याचा हातखंडा आहे. शिवाय आठव्या क्रमांकावर आक्रमक फलंदाजीसाठीही तो प्रसिद्ध आहे. आता या तिघांमध्यो कोणाला संधी मिळणार हे टॉसनंतरच ठरेल.