क्रिकेटमध्ये बाद होण्याचा अकरावा प्रकार Time Out, आधीचे दहा नियम तुम्हाला माहित आहेत का?

ICC Rules: बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेचा अनुभवी फलंदाज अँजेलो मॅथ्यूज टाईम आऊट पद्धतीने बाद झाला.  यावरुन क्रिकेट विश्वात बराच वाद सुरु आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असा बाद होणारा तो पहिलाच खेळाडू ठरला.

राजीव कासले | Updated: Nov 7, 2023, 07:57 AM IST
क्रिकेटमध्ये बाद होण्याचा अकरावा प्रकार Time Out, आधीचे दहा नियम तुम्हाला माहित आहेत का? title=

Rules Of Out In Cricket: भारतात सुरु असलेल्या आयसीसी विश्वचषक स्पर्धा (ICC World Cup 2023) आता शेवटच्या टप्प्यात पोहोचलीय.  पॉईंटटेबमध्ये (WC Pointtable) पहिल्या टॉप फोरमध्ये जागा मिळवण्यासाठी प्रत्येक संघाला विजय गरजेचा आहे. त्यामुळे प्रत्येक सामना चुरशीचा होतोय. बांगलादेश आणि श्रीलंकादरम्यान (Bangladesh vs Sri Lanka) खेळवण्यात आलेला 38 वा सामनाही असाच चुरशीचा ठरला. पण एका वेगळ्यात कारणासाठी तो जास्त चर्चेचा ठरला. या सामन्यात श्रीलंकेचा अनुभवी फलंजा अँजेलो मॅथ्यूजच्या (Angelo Mathews) बाद होण्यावरुन सध्या क्रिकेट विश्वात वाद निर्माण झाला आहे. मॅथ्यूज नियमानुसार बाद झाला, पण काहींच्या मते तो प्रकार खेळभावनेला धरुन नव्हता. 

मॅथ्यूज टाईम आऊट पद्धतीने बाद
अँजेलो मॅथ्यूज हा टाईम आऊट पद्धतीने बाद झाला. क्रिकेटमध्ये बाद होण्याचा हा अकरावा प्रकार आहे. मेरिलबोन क्रिकेट अर्थात MCC च्या नियम 40.1.1 नुसार मैदानातला खेळाडू बाद झाल्यानंतर नव्या फलंदाजाला तीन मिनिटाच्या आत पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज मैदानात असावं लागतं. विश्वचषक स्पर्धेत हा नियम दोन मिनिटाचा आहे. या नियमानुसार बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसनने अपील केलं आणि अँजेलो मॅथ्यूजला बाद देण्यात आलं. हा नियम अस्तित्वात असला तरी खेळभावना म्हणून कधीच वापर झाला नव्हता. त्यामुळे क्रिकेटच्या इतिहासात टाईम आऊट पद्धतीने बाद होणारा अँजेलो मॅथ्यूज हा पहिलाच फलंदाज ठरला आहे. 

कसोटी क्रिकेटला 1877 साली सुरुवात झाली. त्यानंतर एकदिवसीय आणि टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकटेचा प्रकार आला. पण क्रिकेटच्या या तीनही प्रकारात गेल्या 146 वर्षात टाईम आऊट पद्धतीचा वापर करण्यात आला नव्हता. जाणून क्रिकेटमध्ये बाद होण्याचे आधीचे बाद प्रकार

आयसीसी नियमानुसार क्रिकेटमध्ये बाद होण्याचे अकरा प्रकार

1. क्लिन बोल्ड : गोलंदाजाने टाकलेला चेंडू फलंदाजाला चकवून थेट स्टम्पवर आदळतो आणि स्टम्प पडतात त्याला क्लिन बोल्ड म्हणतात.
2. कॅच आउट : फलंदाजाने हवेत मारलेला चेंडू क्षेत्ररक्षक झेलतो त्याला कॅचआूट मानलं जातं.
3 : स्टम्प्ड आऊट : फलंदाज चेंडू खेळण्यासाठी क्रिज सोडून पुढे जातो, पण चेंडू बॅटला न लागता विकेटकिपरच्या हातात विसावतो आणि विकेटकिपर चेंडूने स्टम्प पाडतो त्याला स्टम्प्ड आऊट म्हटलं जातं.
4 : रन आउट : फलंदाज धाव घेण्यासाठी धावतो पण क्रिजवर पोहचण्याआधीच क्षेत्ररक्षक चेंडू स्टम्पवर मारतो त्याला रनाआऊट म्हटलं जातं. मंकडिंग  प्रकारात गोलंदाज चेंडू फेकण्याच्याआधी नॉन स्ट्राईकला असलेला फलंदाज क्रिज सोडतो आणि गोलंदाज चेंडू स्टम्पवर मारतो. 
5  : लेग बिफोर विकेट (LBW) - गोलंदाजाला सरळ रेषेत येणारा चेंडू फलंदाजाच्या बॅटला न लागता त्याच्या पायाला लागतो. त्या प्रकाराला एलबीडब्ल्यू आऊट म्हणतात.
6. हिट विकेट : फलंदाज क्रिजेवर फलंदाजी करताना त्याची बॅट किंवा शरीलाचा कोणता भाग स्टम्पला लागून बेल्स किंवा स्टम्प खाली पडला तर त्याला हिट विकेट आऊट दिलं जातं. 
7 : हँड्स अँड बॅड : जेव्हा फलंदाज बॅटऐवजी हाताने चेंडू अडवतो, त्यावेळी त्या फलंदाजाला हँडस अँड बॅड आऊट पद्धतीने बाद दिलं जातं. 
8. डबल हिट  : जेव्हा फलंदाज बॅटने चेंडू दोनवेळा टोलावतो त्यावेळी फलंदाजाला डबल हिट आऊट दिलं जातं. 
9. ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड  : जेव्हा एखादा फलंदाज क्षेत्ररक्षणात जाणून बूजून अडथळा निर्माण करत, त्यावेळी त्या फलंदाजाला बाहेरचा रस्ता दाखवला जातो.
10. रिटायर्ड आउट:  फलंदाज मैदानावर फलंदाजी करताना जखमी झाला किंवा अचानक आजारी पडून मैदान सोडावं लागंल तर अशा खेळाडूला रिटायर्ड आऊट घोषित केलं जातं. 
11 : टाइम आउट : मैदानावर फलंदाज बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी येणारा नवा फलंदाज टाईम आऊटच्या आत मैदानात न आल्यास नव्या फलंदाजाला बाद दिलं जातं. 

आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्या दहा पद्धतीने बाद होण्याचे प्रकार अनेकवेळा झाले आहेत. पण टाईम आऊट पद्धतीने बाद होण्याचा पहिलाच प्रकार यंदाच्या आयसीसी विश्वचषकात घडला आहे. अँजेलो मॅथ्यूज टाईम आऊटने पद्धतीने बाद होणारा पहिला खेळाडू ठरला आहे. यानिमित्ताने क्रिकेटचे नियम पुन्हा चर्चेत आले आहेत. क्रिकेटच्या काही तज्ज्ञांनी शाकिब अल हसनच्या खेळभावनेवर प्रश्न उपस्थित केला आहे. तर काहींच्या मते संघाच्या विजयासाठी नियला धरुन असेल तर शाकीब अल हसनचा निर्णय योग्य होता.