शाहिद आफ्रीदी-शोएब मलिक सोबत २ भारतीय खेळाडू एकाच टीममध्ये

हे दोन भारतीय खेळाडू पाकिस्तान खेळाडूंसोबत एकाच टीममध्ये सामील

Updated: May 3, 2018, 06:08 PM IST
शाहिद आफ्रीदी-शोएब मलिक सोबत २ भारतीय खेळाडू एकाच टीममध्ये  title=

मुंबई : या महिन्याच्या शेवटी ३१ मे रोजी लॉर्डसवर होणाऱ्या टी२० चॅलेन्जसाठी भारताकडून दिनेश कार्तिक आणि हार्दिक पंड्या यांना आयसीसी रेस्ट ऑफ द वर्ल्ड ११ टीमममध्ये सामील करण्यात आलं आहे. आयसीसीनुसार कार्तिक आणि पंड्या या टीमममध्ये सामील असतील, आयसीसीने ठरवलेल्या टीममधील खेळाडूंच्या संख्या सध्या ९ आहे. पुढील खेळाडूंच्या नावाची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. इंग्लंडच्या इयोन मॉर्गनला टीमचा कप्तान बनवण्यात आलं आहे. या तीन खेळाडूंसह पाकिस्तानचा शोएब मलिक, शाहिद आफ्रीदी आणि श्रीलंकेचा थिसारा परेरा तसेच बांगलादेशचा ऑलराऊंडर शाकिब अल हसने देखील सामन्यासाठी सहमती दिली आहे. 

बांगलादेशचा तमीम इकबाल आणि अफगाणिस्तानचा स्टार लेग स्पिनर राशिद खान यांनी देखील टीममध्ये खेळण्याविषयी संमती दाखवली आहे.

या सामन्याला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यात आला आहे. या सामन्यातून येणारं उत्पन्न कॅरेबियन द्वीप समुहाचे रोनाल्ड वेब्सर पार्क (एंग्विला), सर विवियन रिचर्ड्स स्टेडियम (एंटिगा) विंडसर पार्क स्टेडियम (डोमिनिका) शेरले रिक्रिएशन ग्राऊंड आणि सेंट मार्टिनमध्ये कारिब लंबर बॉल पार्क स्टेडियम ठिक केलं जाणार आहे. वेस्टइंडीजने या आधीच आपल्या मॅचची घोषणा केली आहे. कार्लोस ब्राथवेट (कॅप्टन), सॅमुअल बद्री, रायद एमरित, आंद्रे फ्लेचर, ख्रिस गेल, ईविन लुइस, एस्ले नर्स, कीमो पॉल, रोवमॅन पॉवेल, दिनेश रामदीन (विकेटकीपर), आंद्रे रसेल, मार्लन सॅमुअल्स, केस्रिक विलियम्स