ICC WTC Final: आर अश्विन आऊट होताच बायको नाराज; ट्वीट करून म्हणाली...

टीम इंडियाच्या फलंदाजी दरम्यान 8 व्या क्रमांकावर ऑलराऊंडर आर अश्विन उतरला होता. 27 चेंडूमध्ये त्याने 22 धावा केल्या. 

Updated: Jun 21, 2021, 06:29 AM IST
ICC WTC Final: आर अश्विन आऊट होताच बायको नाराज; ट्वीट करून म्हणाली...

मुंबई: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना सुरू आहे. तिसरा दिवस इंग्लंडच्या नावावर झाला. त्यांचे 4 खेळाडूच टीम इंडियावर भारी पडले. न्यूझीलंडने 2 गडी गमावून तिसऱ्या दिवस अखेर 101 धावा केल्या. टीम इंडियाचे 217 वर 9 गडी बाद झाले आहेत. त्यामुळे आता क्रिकेटप्रेमींची धाकधूक वाढली आहे. 

टीम इंडियाच्या फलंदाजी दरम्यान 8 व्या क्रमांकावर ऑलराऊंडर आर अश्विन उतरला होता. 27 चेंडूमध्ये त्याने 22 धावा केल्या. यामध्ये 3 चौकारही ठोकले. तो चांगल्या फॉर्ममध्ये खेळायला सुरुवात करतानाच आऊट झाला. त्यामुळे निराशा झाली. आर अश्विन आऊट झाल्यामुळे पत्नीही नाराज झाली. तिने ट्वीटवर प्रतिक्रिया दिली आहे. तिची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

न्यूझीलंडचा सीरियर बॉलर टिम साउदीने आर अश्विनला बॉल टाकला आणि टॉम लाथमने कॅच आऊट केलं. त्यानंतर पत्नी प्रीति नारायणनने बाल्कनीतून अय्यो अशी प्रतिक्रिया देत ट्वीट केलं. तिचासह अनेक क्रिकेटप्रेमींचा मोठा हिरमोड झाला. चौथ्या दिवशी आज टीम इंडियाचे स्पिनर्स कमाल दाखवणार का याकडे आता संपूर्ण जगाचं लक्ष आहे.

न्यूझीलंडला कमी धावांवर रोखण्याचं लक्ष टीम इंडियाच्या बॉलर्सकडे आहे. त्यामुळे आता सर्वजण टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थना करत आहेत. पहिल्य़ा दिवशी पावसानं खेळ केल्यानं दिवस वाया गेला. तर टीम इंडियाने दुसऱ्या दिवस अखेर 146/3 असा स्कोअर केला होता. तिसऱ्या दिवशी 217वर ऑलआऊट झाले.