Virat कोहलीचा मैदानातील भांगडा डान्स सोशल मीडियावर व्हायरल

विराट कोहलीचा भांगडा डान्स सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Updated: Jun 20, 2021, 10:35 PM IST
Virat कोहलीचा मैदानातील भांगडा डान्स सोशल मीडियावर व्हायरल title=

मुंबई : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) दरम्यान आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (ICC World Test Championship Final) सामन्यात पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडिया मोठी धावसंख्या उभारु शकली नाही. पण याबाबत विराट कोहली (Virat Kohli) याच्या चेहऱ्यावर जराही चिंता दिसत नाही.

विराट कोहलीचा पंजाबी डान्स

टीम इंडिया (Team India) चा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) फील्डिंग दरम्यान मस्तीच्या मूडमध्ये दिसला. न्यूझीलंड (New Zealand) विरुद्धच्या पहिल्या इनिंगमध्ये 9 नवव्या ओव्हरमध्ये स्टेडियमवर ढोलचा आवाज येत असताना विराट कोहली पंजाबी डान्स करताना दिसला.

विराट कोहली (Virat Kohli) चा हा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराटचा हा भांगडा डान्स त्याच्या चाहत्यांना ही फारच आवडला. त्याच्या या डान्सवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.